क्राइम

शिर्डीत भिकाऱ्यांची धरपकड : कोणी रिटायर्ड अधिकारी तर कोणी कुटुंबाचे कर्ज फेडण्यासाठी भिकारी 

Spread the love

शिर्डी /नवप्रहार ब्युरो 

                  अलीकडे भिकारी बनून भीक मागणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. रेल्वे, बस डेपो, मंदिराच्या बाहेर  असलेले भिकारी एखाद्याच्या मागे अक्षरशः पैशाच्या प्रमाणे लागतात. त्यांच्या पासून पिछा सोडविण्यासाठी लोक काही चिल्लर त्यांच्या हवाली करतात. मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी देश – विदेशातील लोक येतात. भिकारी सगळ्यांनाच त्रास देतात.  भाविकांच्या तक्रारी वरून साईबाबा मंदिर परिसरात भिकारी धरपकड मोहीम राबविण्यात आली . यात 80 भिकाऱ्यांना अटक करण्यात आली.=

यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई येथे कार्यरत असलेले सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक भीक मागताना सापडले.तर दुसरी कडे मुलावर कर्ज झालं म्हणून अख्ख कुटुंब भीक मागत असल्याच्या दोन घटना पोलीस तपासात समोर आल्या आहेत. गुरुवारी शिर्डी पोलीस, नगरपरिषद आणि साईसंस्थान यांच्या एकत्रित झालेल्या कारवाईत ही बाब समोर आली आहे.

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भावित येत असतात. आलेला भाविकांनी पैशासाठी त्रास देत असलेल्या भिकाऱ्यांची धडपड मोहीम गुरुवारी शिर्डी पोलीस, नगरपरिषद आणि साईसंस्थान यांच्या वतीनं राबवण्यात आली. यात साधारण 80 महिला आणि पुरुष भिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यात पाच राज्यातील तसेच महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यातील व्यक्ती आढळून आले.

पोलिसांनी तपासणी केली असता मुंबईतील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक देखील गेल्या दहा वर्षापासून भीक मागत असल्याचे समोर आले. व्यसनाधीन झाल्यामुळे नोकरी सोडून देत ते भीक मागत असून त्यांच्या बँक खात्यावर देखील मोठी रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे. भिवंडी येथील एक उच्चशिक्षित तरुणही या भिक्षेकऱ्यांमध्ये आढळला. त्याने पोलिसांसी अस्खलित इंग्रजीत संवाद साधला.

तर दुसऱ्या एका प्रकारात घरात जळीत झालं म्हणून मुलावर कर्ज झाले. त्याला हातभार लावण्यासाठी आई , पत्नी आणि लहान मुलगी देखील भीक मागत असल्याची बाब समोर आली आहे. मोहीमेत सापडलेल्या सर्व भिकाऱ्यांची नावनोंदणी करत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना न्यायालयाच्या आदेशाने पुरुषांची विसापूर तर महिलांची चेंबुर येथील भिक्षेकरी गृहात रवानगी करण्यात आली आहे.

दुहेरी हत्याकांडानंतर प्रशासन आक्रमक

शिर्डीत दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर पोलीस प्रशासन, शिर्डी नगरपंचायत व साईबाबा संस्थानने कारवाईस सुरुवात केली आहे. शिर्डीतील वाढती गुन्हेगारी आणि भाविकांना त्रास देणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. भिक्षेकऱ्यांविरुद्ध देखील धडक कारवाई सुरू केली आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close