ॲड, आशिष टाकोडे यांचे नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभाग मोर्शी येथे निवेदन
मोर्शी / तालुका ओरतिनिधु
निवेदनातून गतिरोधक बसवण्याची केली मागणी*
मोर्शी शहरातील माऊली मल्टीस्टेट सोसायटी समोरील मुख्य रस्त्यावर चौक असून त्या ठिकाणी याआधी अनेक वेळा छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. त्याचबरोबर चार-पाच दिवसांपूर्वी सुद्धा एका शाळकरी विद्यार्थिनीचा त्या ठिकाणी अपघात झाला होता. यापुढेही चौकात आणखी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता मोर्शी शहरातील नागरिकांनी बांधकाम विभागाला माहिती दिली होती. परंतु अजूनही त्या ठिकाणी गतिरोधक बसविले नसल्याकारणाने ॲड, आशिष टाकोडे यांच्या मार्गदर्शनात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून सार्वजनिक बांधकाम कार्यालय मोर्शी येथे निवेदन देण्यात आले. या निवेदनात मोर्शी शहरातील अनेक ठिकाणी गतिरोधक बसविले आहे त्या गतिरोधकाचे खिळे बाहेर निघाले असल्याने त्या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनाचे टायर पंचर होत असल्याने सुद्धा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता नवीन गतिरोधक बसविण्यात यावे त्याचबरोबर जुने गतिरोधक दुरुस्त करण्यात यावे तसेच कॉलनी परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी गतिरोधक ची आवश्यकता आहे तिथे गतिरोधक बसविण्यात यावे याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग मोर्शी येथे दिनांक ३०/१/२०२५ रोजी दुपारी एक वाजता निवेदन देण्यात आले यावेळी आशिष टाकोडे आफताब आलम अजीज पठाण विजय धांडे अनिल ठाकरे उबेद खान विजय शेंडे शहबाज खान जितेंद्र श्रीनाथ यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व शहरातील नागरिक उपस्थित होते.