खेळ व क्रीडा

51 व्या सब-ज्युनिअर राज्य ज्यूदो स्पर्धेत सिद्धी दातरंगे हिने अहिल्यानगर जिल्ह्याला मिळवून दिले ब्राँझ मेडल

Spread the love

नगर -नुकत्याच शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे या ठिकाणी 51 व्या सब-ज्युनिअर राज्य ज्यूदो स्पर्धेमध्ये सिद्धी अशोक दातरंगे हिने -52 किलो वजनी गटात अहिल्यानगर जिल्ह्या कडून नेतृत्व केले. त्यामधे तीने ब्राँझ मेडल पटकावले. गुरुजनांच्या आशीर्वाद व आई-वडिलां ची खंबीर साथ तिला हा खेळ खेळण्यासाठी आहे.
सिद्धीचे वडील अशोक दातरंगे हे एक समाजसेवक असून ते मनसे वाहतूक सेना शहर जिल्हाध्यक्ष आहे. सिद्धीच्या घराला पहिल्यापासून खेळाचा वारसा चालत आलेला आहे. सिद्धी दातरंगे ही भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मध्ये इयत्ता सातवी मध्ये शिकत असून ती यंग मेन्स जुडो क्लब सिद्धी बागची खेळाडू आहे.
तिला राष्ट्रीय किर्तीचे मार्गदर्शक प्रा. संजय धोपावकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू आदित्य धोपावकर, शालेय खेळ शिक्षक कैलास करपे सर , व सुनील गायकवाड सर , तसेच पीएसआय पै.गणेश लांडगे, विनीत बुरला , फायाज सय्यद , सोनाली साबळे, पै.शुभम दातरंगे ,वस्ताद जयंत (लहानु) शिंदे, पै.गोरख खंडागळे, अथर्व नरसाळे , पियुष शिंगारे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल तिचे पर्जन्येश्‍वर मित्र मंडळ, श्री एकदंत मित्र मंडळ; दातरंगे मळा मंडळाच्या वतीने तिचे कौतुक व सत्कार करण्यात आले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

51 व्या सब-ज्युनिअर राज्य ज्यूदो स्पर्धेत सिद्धी दातरंगे हिने ब्राँझ मेडल मिळविले. याप्रसंगी राष्ट्रीय किर्तीचे मार्गदर्शक प्रा. संजय धोपावकर, पीएसआय पै.गणेश लांडगे, पै.शुभम दातरंगे आदी उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close