मोर्शी- वरुड मतदार संघातील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी आ.यावलकर प्रयत्नशील
वरुड / प्रतिनिधी :
अमरावती (मोर्शी वरुड) : मा . मुखमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे माहे जुलै ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या फळबाग लागवड शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत विनंती केली त्याच अनुषंगाने आज मा. श्री मकरंदजी जाधव, मदत व पुनर्वसन मंत्री, यांना अमरावती जिल्ह्या करिता १३८ कोटी मिळावे यासाठी मागणी केली त्यात वरुड-मोर्शी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या फळगळतीचे (संत्रा, मोसंबी) अतिवृष्टिमुळे झालेले नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील फळबाग लागवड धारक शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून तातडीने मदत मिळावी, यासाठी पुढाकार वरुड-मोर्शी मतदारसंघाचे आमदार उमेश उर्फ चंदूभाऊ यावलकर यांनी घेतला आहे.
अमरावती जिल्ह्यातील माहे जुलै ऑगस्ट २०२४ या कालावधीत सततधार पावसामुळे फळबाग लागवडीचे नुकसान झाले होते, तसेच माझ्या वरुड मोर्शी मतदार संघात मोठ्या प्रमाणात संत्रा लागवड होत असून संत्रा पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे व त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या फळबाग लागवड शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे त्याच धरतीवर अमरावती जिल्ह्यात विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी याकरिता मुख्यमंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे सातत्याने मांगणी केली आहे व माझ्या मतदारसंघात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या फळबाग लागवड शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, या करिता विनंती करण्यात आली..
विशेषतः वरुड-मोर्शी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात संत्रा पिकाची लागवड केली जाते. मात्र, या सततच्या पावसामुळे संत्रा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
वरुड-मोर्शी मतदारसंघाचे आमदार उमेश यावलकर यांनी या प्रश्नावर जोरदार पाठपुरावा केला आहे. त्यांच्या मते, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई मिळाली आहे. त्याच धर्तीवर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.
सततधार पावसामुळे झालेले नुकसान फक्त आर्थिकच नव्हे, तर सामाजिक स्तरावर शेतकऱ्यांच्या रोजच्या जीवनावरही गंभीर परिणाम करत आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
शासनाकडे पाठपुरावा आणि आश्वासन
आमदार उमेश यावलकर यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांनी संबंधित विभागांकडे शेतकऱ्यांच्या फळबाग गळतीचे त्वरित सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.