50 वर्षापासून ताब्यात असलेली जागा श्री विठ्ठल मंदिरची ट्रस्ट ला कोणत्याही मोबदला न घेता सुपूर्द केल्याबद्दल वरुडे बंधूंचा सत्कार
नगर – श्री विठ्ठल मंदिर ट्रस्ट च्या मालकीची तोफखाना येथे दत्तात्रय रामचंद्र वरुडे व बाळासाहेब रामचंद्र वरुडे यांच्या कडे 50 वर्षापासून ताब्यात असलेली जागा विठ्ठल मंदीर ट्रस्ट ला कोणताही मोबदला न घेता सुपूर्द केली.त्याबद्दल त्यांचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला.याप्रसंगी राजुमामा जाधव,ड.धनंजय जाधव,ट्रस्टचे अध्यक्ष रमेश बोगा ,सुभाष धोत्रे,राजेंद्र बोगा,अनिल बोगा,संजय बोगा,सुर्यकांत कांबळे,नरेश कांबळे,शिवदत्त पांढरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ड.धनंजय जाधव म्हणाले की,दत्तात्रय वरुडे व बाळासाहेब वरुडे यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.त्यांना राहण्यासाठी घर नसताना देखील त्यांनी जागा खाली करून दिली.तसेच ज्या ठिकाणी देवस्थानाच्या जागेवर भाडेकरूंचा ताबा आहे व ज्यांच्याकडे दुसरीकडे जागा आहे त्यांनी त्यांच्या ताब्यातील जागा देवस्थानकडे सुपुर्द करुन समाजापुढे आदर्श ठेवावा.
तसेच यावेळी श्री विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रमेश बोगा यांनी वरुडे बंधुचे व तसेच याकामी सहकार्य केले म्हणून राजुमामा जाधव व ड.धनंजय जाधव यांचे आभार मानले.