पत्रकार दिनानिमित्त यवतमाळमध्ये आमदार मांगुळकरांच्या उपस्थितीत पत्रकारांचा गौरव
यवतमाळ :/प्रतिनिधी
६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली,ती म्हणजे ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राची स्थापना.समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर प्रखर टीका करून सकारात्मक समाज निर्मितीचा विचार मांडण्यासाठी त्यांनी केलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ,महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
याच अनुषंगाने कॉम्रेड सचिन मनवर मित्रपरिवार,यवतमाळ यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे पत्रकारांच्या सन्मानार्थ सत्कार व पुस्तक वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर उपस्थित होते.त्यांनी यावेळी पत्रकार बांधवांचा सत्कार करून पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला दैनिक यवतमाळ सुपरचे मुख्य संपादक नितीन भुसरेड्डी,दैनिक आत्ताची एक्सप्रेसचे जिल्हा प्रतिनिधी मकसूद अली,इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी कलीम खान, केजीएन वृत्तवाहिनीचे सय्यद मतीन,दैनिक अमरावती दर्शनचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विजय बुंदेला,दैनिक देशोन्नतीचे तुषार देशमुख,साम टीव्हीचे संजय राठोड,दैनिक जनमाध्यमचे विवेक वानखेडे,दैनिक नवभारत चे रविष वाघ,यांसह विविध माध्यमांचे प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.याशिवाय,माजी नगराध्यक्ष संतोष बोरले,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संतोष ढवळे,शैलेश गुल्हाने,तालुका काँग्रेस कमिटीचे रमेश भीसनकर,प्रा.पंढरी पाठे, प्रकाश कांबळे,बिरसा ब्रिगेडच्या विद्या परचाके,लिना बोरकर यांचीही या कार्यक्रमात उपस्थिती होती.