बिआरएसच्या सदस्य नोंदणीला तालुक्यात मोठा प्रतिसाद
माजी आमदाराला मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहता आजी आमदारांच्या चिंता वाढल्या
तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
घाटंजी-तालुक्यात बिआरएस पक्षाच्या सदस्य नोंदणी ला सुरूवात झाली असून तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ‘अबकी बार किसान सरकार’ म्हणत तालुक्यात सदस्य नोंदणी करण्यात येत आहे. या सदस्य नोंदणी ला सीमावर्ती भागात मोठा प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळत आहे.
तेलंगाना राज्यातील योजना, कामे, विकास हे सीमावर्ती भागातील ग्रामस्थ पाहत असल्याने महाराष्ट्रात सुध्दा त्या प्रमाणे विकास करण्याचे आश्वासन तेलंगाना राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्र राज्यातील विविध सभेत दिले आहे.के.चंद्रशेखर राव यांच्यावर विश्वास करून बिआरएस सीमावर्ती भागातील जनता भाजपाला कायमचे रामराम ठोकणार असे पक्ष कार्यकर्ते कडून बोलल्या जात आहे.जनता मोठ्या प्रमाणात पक्षाच्या सदस्य नोंदणीला प्रतिसाद देत बिआरएस पक्षात सामील होत असलेल्या प्रतिसादावरून दिसून येत कि, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडूकीत बि आर एस बाजी मारणार असल्याची श्यक्यता नाकारता येत नाही . भाजपाचे माजी आमदार तोडसाम यांनी बिआरएस पक्षाचा झेंडा हाती घेतल्याने राजू तोडसाम यांचा चाहता वर्ग यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सदस्य होऊन बिआरएस पक्षात प्रवेश नोंदणी करीत आहे.सध्यातरी घाटंजी तालुक्यात बिआरएस सदस्य नोंदणीला मिळणारा प्रतिसाद पाहता सत्ताधारी पक्षाला धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.