घाटंजी-नुक्ती येथे शेतकरी आत्महत्या
घाटंजी तालुका प्रतिनिधि- सचिन कर्णेवार
घाटंजी- येथून तीन किलोमीटरअंतरावर असलेल्या नुकती गावाचे शेतकरी मनोज चंपत पडवे वय ५० वर्ष यांनी एका शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.मनोज पडवे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे तीन एकर कोरडवाहू शेती आहे.त्यांना एक मुलगी एक मुलगा असून एक वर्षा आधी मुलीचे लग्न झाले आणि सततची नापिकी त्यात ते कर्जबाजारी झाल्याने तसेच सोसायटीचे कर्ज तीन वर्षापासून थकीत असल्याची आणि काही खाजगी लोकांकडून कर्ज घेतले असल्याने ते आर्थिक हतबल झाले.घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ते सदैव चिंतेत राहायचे. त्यांचे उत्पन्नाचे साधन फक्त शेती होती. कर्ज फेडण्याचा दुसरा कोणताही मार्ग नसल्याने त्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबिला चे कारण समोर येत आहे. मृत्यू पुर्वी संत भोजाजी महाराज यांच्या तीन दिवस पालखीत जाऊन आल्यानंतर रात्री ते घरी पोहोचले. जेवण केल्यानंतर बाहेर संडासला जातो म्हणून पत्नीला सांगितले आणि त्यांनी बाहेरच एका झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले त्यांच्या या जाण्याने पडवे परिवारावरती मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा त्यांचा परिवार आहे.