अपघात
दुचाकी स्वराला वाचविण्याच्या नादात खाजगी बस रस्त्याखाली उतरली.
शिरखेड फाटा जवळील घटना सर्व प्रवासी सुखरूप
मोर्शी. / ओंकार काळे
अमरावती वरून मोर्शी जाणारी खाजगी बस बुधवारी दिनांक 11 दुपारी दीड वाजता सिमेंट रस्त्याच्या खाली उतरली.या बस समोर अचानक दुचाकी स्वार आला त्याला वाचविण्याच्या नादात बस चालकाचे नियंत्रण सुटले व खाजगी बस रस्त्याच्या खाली उतरली.
या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. महालक्ष्मी ट्रॅव्हल्स ची खाजगी बस प्रवाशांना घेऊन मोर्शी येथे दुपारच्या सुमारास जात होती. लेहगाव जवळील शिरखेड फाट्याजवळ आल्यानंतर या बस समोर अचानक एक दुचाकी आली.या दुचाकी ला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने ही बस रस्त्याच्या खाली उतरवली सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याचे सांगितले जाते. अपघाताची माहिती मिळताच शिरखेडचे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
1
+1
+1