अपघात

बसची बोलेरो पिकअप ला धडक

Spread the love
१८ जख्मी ४ गंभीर प्राथमिक माहीती
घाटंजी ता प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
           बस ने बोलेरो पिकअप ला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात बस आणि बोलेरो मधील १८  लोक जखमी झाले आहेत. यातील ४ गंभीर जखमींना यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
           उपलब्ध माहिती नुसार एसटी महामंडळाची बस किनवट  वरून यवतमाळ  कडे जात होती. दरम्यान घाटंजी ते आकपुरी च्या मधात एक बोलेरो पिकअप वाहन रस्त्यात उभे होते. बस चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने बस बोलेरो वाहनाला जाऊन भिडली.
             धडक इतकी जबरदस्त होती की बोलेरो धडकेनंतर रस्त्याच्या कडेला झाडावर जाऊन आदळली. तर बस च्या समोरच्या काचेचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. यात १८ प्रवासी जखमी झोके आहेत . यातील ४ लोक गंभीर जखमी असल्याने त्यांना यवतमाळ येथे पाठविख्यात आले आहे. तर काही जखमी वर घाटंजी येथील  रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास वडगाव पोलीस करत आहेत.
जखमींची नावे अशी आहेत- 
  अनिता सुधाकर मंगाम अंजी, विमल पांढूरंग मोडरे घाटंजी, रुक्मिणी लक्ष्मण लामतूडे सोनखस,  अविनाश शिवराम मानकर तरोडा,निलेश देवसिंह चव्हाण कुर्ली, बळीराम रामप्रसाद राठोड गोविंद पूर असे .
         00000000000000000000
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close