क्राइम

पोलिस उपनिरीक्षक आणि अन्य लोकांच्या तगादयाला कंटाळलेल्या तरुणाची आत्महत्या 

Spread the love

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अक्षय चा मृतदेह धरणात आढळला

सावंतवाडी / नवप्रहार डेस्क 

                        भाड्याने गाडी मिळवून देण्यासाठी मध्यस्थ असलेल्या तरुणाला अपघातग्रस्त वाहनाची रक्कम भरून देण्यासाठी टॉर्चर  करण्यात येत असल्याने त्यांच्या तगाद्याला  त्रासून २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.९ लोकांच्या नावाचा सूसाईड नोट मध्ये उल्लेख करत तरुणाने धरणात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षय जनार्दन साईल असे तरुणाचे नाव आहे. या नऊ लोकांत एका पोलिस उपनिरीक्षकाच्या नावाचा उल्लेख आहे.

दरम्यान या आत्महत्येच्या प्रकारानंतर कोलगाव ग्रामस्थ आक्रमक झाले असून अक्षयच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या व चिठ्ठीत उल्लेख असलेल्या संशयितांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचा काम सुरू होते.

कोलगाव येथील व्यवसायाने इंजिनियर असलेल्या अक्षय साईल हा मंगळवारपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबाने पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडून शोध सुरू होता. त्यातच अक्षयची दुचाकी चप्पल हे माडखोल धरण परिसरात आढळून आले. त्याने बेपत्ता होण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. अखेर अक्षयचा मृतदेह सापडल्यानंतर सर्वच गोष्टीचा उलगडा झाला.

धमकी देणाऱ्यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश

अक्षयची आत्महत्या गाडीच्या अपघातानंतर व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून झाल्याचे पुढे आले आहे. आपल्याला ब्लॅकमेलिंग व मारहाण केल्यामुळे आपला जीवन प्रवास संपवत आहे. असे सांगून तब्बल ९ जणांच्या नावाचा उल्लेख या चिठ्ठीत केला आहे. यातील काहि जण कोलगाव येथील तर ५ जण तर मुंबईमधील ४ असा त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्याला धमकी देणाऱ्यामध्ये मुंबईतील एका पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश आहे.

या सर्व प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर कोलगाव सरपंच संतोष राऊळ व अन्य ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत सावंतवाडी पोलीस ठाणे गाठले. यावेळी माजी आमदार राजन तेली हे ही उपस्थित होते. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्व प्रकार गाडीचा अपघात झाल्याच्या कारणावरून घडला आहे. मुंबईतील एका व्यक्तीची गाडी अन्य एकाला भाड्याला देण्यात आली होती. त्यात अक्षयाने मध्यस्थी केली होती. मात्र त्या गाडीचा अपघात झाला. त्यानंतर गाडीचा विमा देण्यासाठी विमा कंपनीने नकार दिला. त्यामुळे यातील तब्बल साडेआठ लाख रुपये हे अक्षय याच्याकडून वसूल करण्यासाठी तगादा लावण्यात आला होता. त्यातील तीन लाख रुपये घेण्यात आले. अन्य रक्कम ही देण्यासाठी त्याच्यावर जबरदस्ती करण्यात आली तसेच त्याला ब्लॅकमेलिंग करण्यात आले. या सर्व प्रकारानंतर अक्षयने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

स्टेटसवर चिठ्ठी, मित्रांना शेवटचे हाय

अक्षयने झालेल्या मारहाणी नंतर नैराश्यातून चिठ्ठी लिहिली आणि संशयितांना व्हाट्सअपच्या माध्यमातून त्यांनी ही चिठ्ठी पाठवली व काही मित्रांना शेवटचे “हाय” असा मॅसेज टाकून आपल्या मोबाईलवर संशयितांचे फोटो आणि त्यांनी केलेले चॅटिंग स्टेटसवर ठेवले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close