एकलव्य गुरुकुल स्कूल येथे विविध उपक्रमाने शिक्षण सप्ताह उत्साहात
नांदगाव खंडेश्वर /.संदीप अंबोरे
स्थानिक युवा विकास केंद्र द्वारा संचालित, एकलव्य गुरुकुल स्कूल नांदगाव खंडेश्वर येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिक्षण सप्ताह अंतर्गत 22 जुलै तें 28 जुलै दरम्यान विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये 22 जुलै रोजी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस साजरा करण्यात आला शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश करण्यात आला. अध्ययन व अध्यापन किती सोपे होते कठीना कडून सोप्याकडे कसे आणले जाते. आनंददायी शिक्षणाची निर्मिती कशी केली जाते ही या उपक्रमातून स्पष्ट झाले.
23 जुलै रोजी गणित या विषयाशी संबंधित मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी खेडीमेडीच्या वातावरणात गणिताशी संबंधित ऍक्टिव्हिटी पूर्ण केल्या तसेच या दिवशी परिपाठामध्ये निपुण प्रतिज्ञा सुद्धा घेण्यात आली
24 जुलै रोजी क्रीडा दिवस साजरा करण्यात आला हा विविध खेळ क्रीडा स्पर्धा राबवून क्रीडा दिन साजरा करण्यात आला या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढावी यासाठी विद्यार्थ्यांना देशी खेळाचे महत्व समजावे यामध्ये लंगडी, खोखो,मैदानी स्पर्धा,लगोरी, रस्सीखेच, तसेच एकलव्य गुरुकुल स्कूलमध्ये ज्या खेळाचा सराव नियमित चालतो असे खेळ ज्यामध्ये या शाळेचे विद्यार्थी राज्य,राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, स्पर्धेमध्ये पदक प्राप्त केली. डॉजबॉल, धनुर्विद्या, नेटबॉल, अशा खेळांचा सुद्धा समावेश होता
25 जुलै रोजी सांस्कृतिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला वेशभूषा,नृत्य, नाट्य, गाणी, समूहगीत, पथनाट्य, कथाकथन, सामूहिक गायन, लोकनृत्य, लोककला, असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले
26 जुलै रोजी कौशल्य व डिजिटल दिवस राबविण्यात आला. शिक्षा सप्ताह अंतर्गत शिक्षणात दिवसानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नांदगाव खंडेश्वर येथील राजेंद्र उन्होने( शिल्प निदेशक ) यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध कौशल्य पर्यायाचे महत्त्व आणि विविध, या डिजिटल युगामध्ये काय अवलंबवावे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच नांदगाव खंडेश्वर येथील पुरातन ऐतिहासिक स्थळ येथे खंडेश्वर मंदिराला विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती घेण्यात आली
27 जुलै रोजी मिशन लाईफच्या दृष्टीशेपात इको क्लब स्थापना करून विद्यार्थ्यांचा गट तयार करण्यात आला वृक्षारोपण करण्यात आले व तसेच विद्यार्थ्यांनी मातीमध्ये सीडबॉल तयार करून आणले वेगवेगळ्या झाडांचे बी मातीमध्ये टाकून सिडबॉल बनविले ते बहिरम टेकडी मधील रानात काटेरी झुडपात टाकण्यात आले असून एकूण 400 विद्यार्थ्यांनी हे सीडबॉल बनवून आणलेली होती. तसेच वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांनी आपल्या नावाची पाटी बनवून वृक्ष संगोपनाची जबाबदारी देऊन वृक्ष दत्तक देण्यात आले एक विद्यार्थी एक वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले. वृक्षारोपणासाठी विद्यार्थ्यांचे पालक प्रतिनिधी शरद घोडेस्वार, दिनेश गुल्हाने यांनी सहभाग घेतला
28 जुलै रोजी समुदाय सहभाग दिवस स्नेहभोजनाचा कार्यक्रम राबविण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाला एकलव्य गुरुकुल स्कूलचे मार्गदर्शक सदानंद जाधव ( राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ) यांच्या मार्गदर्शनात उपक्रम राबविण्यात आले असून कार्यक्रमाला उपस्थित विशाल ढवळे( अध्यक्ष एकलव्य क्रीडा अकादमी ) एकलव्य गुरुकुल स्कूलचे व्यवस्थापक अनुप काकडे, मुख्याध्यापक विलास मारोटकर धनुर्विद्या क्रीडा मार्गदर्शक अमर जाधव, संपूर्ण शिक्षण सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी एकलव्य गुरुकुल स्कूलचे शिक्षक व शिक्षिका गजानन शेळके, श्रीकांत खांडेकर, स्वप्निल पाटील, प्रतीक कोल्हे, सीमा पोहनकर, पूजा ठाकरे, वैशाली भगत, सुनिता मारोटकर, निकिता वाघ, रेवती परसनकर, पंकज खांडेकर, मोहित झोपाटे, सुरेंद्र चौधरी, ईश्वर जाधव, गुंजन नेवारे, अश्विनी शिरभाते, प्रीतम ठाकरे,सारिका काळेकर, सिद्धिका पोपळकर, प्रतीक्षा चव्हाण,वैशाली मोरे, नीलिमा देवघरे, अपर्णा चव्हाण, रेखा पंचगडे, सविता सुने यांनी परिश्रम घेतले