क्राइम

आत्महत्या की घातपात….  बार डान्सर तरुणीचा रूम मध्ये आढळला मृतदेह

Spread the love

कोलकाता  / नवप्रहार डेस्क 

                     एकाच भेटीत प्रेम, किंवा समाज माध्यमांवर झालेले प्रेम यानंतर  ते लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतात. क्षणात झालेले हे प्रेम टीकतीलच याचा काही नेम नसतो. त्यामुळे लहान सहान भांडणात देखील हे टोकाचे निर्णय घेतात. असाच प्रकार कोलकाता च्या तीलजला परिसरात घडला आहे. 

नेपाळची एक तरुण बार डान्सर तिच्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. मात्र एके दिवशी तिच्या खोलीत तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तिचा बॉयफ्रेंड तिथून फरार झाला आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

कोलकात्यामधील एका उपनगरात बार डान्सर म्हणून काम करणाऱ्या 24 वर्षीय नेपाळी महिला बुधवारी (31 जुलै) तिच्या घरात मृत अवस्थेत आढळली. या संदर्भात पोलिसांनी सांगितलं, की तिलजला भागात असलेल्या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह सापडला. तेव्हापासून तिचा लिव्ह इन पार्टनर बेपत्ता आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र त्या तरुणीबरोबर नेमकं काय घडलं व तिचा मृत्यू कशामुळे झाला हे अजून समजू शकलेलं नाही.

बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या तिच्या छोट्या बहिणीला दुपारी त्या लिव्ह इन पार्टनरचा फोन आला होता. त्याबद्दल तिनं तिलजलामधील बहिणीच्या शेजाऱ्यांना सांगितलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, की बहिणीचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याचं लिव्ह इन पार्टनरनं सांगितल्याचा दावा मृत महिलेच्या बहिणीनं केलाय. ते सांगितल्यावर लगेचच त्यानं स्वतःचा मोबाइल बंद केला. त्यानंतर तो तिथून फरार झाला. मग शेजाऱ्यांनी पोलिसांना त्या घटनेबाबत माहिती कळवली.

नेपाळी बार डान्सरच्या गळ्यावर असलेल्या खुणा पाहून तिनं आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे, असं पोलिसांनी म्हटलंय. मात्र घटना घडल्यापासून मृत महिलेचा प्रियकर बेपत्ता आहे. शोध घेऊनही तो अजून सापडलेला नाही. त्यामुळे महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला, ती आत्महत्या होती की हत्या याबाबत तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. पोलिसांनी सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्यानंतर काही गोष्टी स्पष्ट होऊ शकतात.

या घटनेमध्ये लिव्ह इन पार्टनर बेपत्ता असल्यामुळे संशय व्यक्त केला जातोय. वरकरणी ती आत्महत्या असल्याचं दिसत असलं, तरी कदाचित ती हत्याही असू शकते. पोलीस या घटनेचा तपास करत असून बेपत्ता प्रियकर सापडल्यानंतरच ते अधिक स्पष्ट होऊ शकतं. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लिव्ह इन नातेसंबंधांवरूनही गुन्हे वाढत असल्याचं दिसत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close