शेती विषयक

तालुक्यात पाऊस जरी कमी असला तरी ही शेती मशागतीच्या कामाला वेग

Spread the love

अनिल डाहेलकर

मूर्तिजापूर : दरवर्षीच्या तुलनेत सद्या पाऊस कमी जरी असला तरी शेती मशागतीच्या कामाला सर्वत्र वेग आल्याच्या दिसून येत आहे .

ग्रामीण जीवन हे खऱ्या अर्थाने शेतीवर अवलंबून आहे. तर शेती ही पावसावर .. पाऊस मुबलक आणि पिकांना पूरक हवा तसा बरसला तर उत्पन्नात वाढ होऊन ग्रामिण जिवन सुखकर होते . मात्र मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गच नव्हे तर शेतीवर अवलंबून शेत मजुर ही चिंतातूर होतो.

दरम्यान नुकताच बरसलेला पाऊस हा अल्पसा जरी असला तरी शेतकऱ्यांना समाधान देऊन गेला . तर शेती मशागतीला वेग वेग येत असल्याने थोडे तरी चैतन्याचे वातावरण निर्माण झाले .
तसेच शेती कामात उपयोगी येणाऱ्या विळे , खुरपं , कुऱ्हाड कोपडी अशा औजारांना पाठवण्याचे लोहारी काम करणाऱ्या हातास ही काम मिळाले आहे .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close