आर्वी येथे धम्मपद ग्रंथ वितरण सोहळा व धम्म प्रबोधन, आंबेडकरी कवी संमेलनाचे आयोजन संपन्न
आर्वी / प्रतिनिधी
शहरातील सिद्धार्थ बुद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर आर्वी येथे धम्मपद ग्रंथ वितरण धम्म प्रबोधन मेळावा व आंबेडकरी कवी संमेलनाचे आयोजन पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन
आदरणीय रवी भिमके यांनी केले.
तरी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी
ज्येष्ठ कवी सुरेश वंजारी नागपूर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक तथा धम्मपद या ग्रंथाचे वितरक निळाईचे मुख्य संयोजक प्रा. प्रवीण कांबळे नागपूर हे होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी धम्म प्रचारक व ग्रंथपाल सुरेश भिवगडे, प्रा. डॉ.विजयाताई मुळे अनिल मालके ज्येष्ठ गझलकार सूर्यकांत मुनघाटे, धम्म प्रचारक मधुकर सवाळे, सुनिता तायडे केंद्रीय शिक्षिका भारतीय बौद्ध महासभा कारंजा
समाजसेविका यशोदाताई व्यंकटेश आत्राम
भारती बनसोड ( गौतमी महिला बचत गट आर्वी ) भानुदासजी फुसाटे, अनिल खैरकर राजकुमार सोनटक्के
आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरवात महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध व
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून वंदन करून त्रिशरण पंचशील घेऊन करण्यात आली.
या कार्यक्रमा प्रसंगी माननीय सूर्यकांत मूनघाटे यांनी धम्मपदावर विश्लेषणात्मक मांडणी करत गाथांचे सुंदर विवेचन केले. तसेच प्रा. प्रवीण कांबळे यांनी धम्मपद हे प्रत्येक विहारात वाचले जावे व धम्मपदांच्या गाथांचा अर्थ समजून घेत आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. याप्रसंगी आर्वी शहरातील बुद्ध विहारांना धम्मपद उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेट म्हणून देण्यात आले.
याप्रसंगी धम्म सेविका सुनिता तायडे कारंजा यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल धम्मपद व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यामध्ये महाप्रजापती गौतमी बुद्ध विहार वाल्मिकी वॉर्ड आर्वी,
तक्षशिला बुद्ध विहार संजय नगर आर्वी,
सिद्धार्थ बुद्ध विहार कन्नमवार नगर आर्वी,
त्रिरत्न बुद्ध विहार जाम,
भीमोदय बुद्ध विहार दत्त वॉर्ड आर्वी,
सिद्धार्थ बुद्ध विहार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर आर्वी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले निशुल्क अभ्यासालय वसंत नगर आर्वी,
सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी,
प्रज्ञा शील करुणा ग्रुप आर्वी
इत्यादींना धम्मपद वितरित करण्यात आले.
याप्रसंगी आंबेडकरी कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते या
आंबेडकरी कवी संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवी सुरेश वंजारी नागपूर हे होते.
याप्रसंगी प्रांजली व्यंकटेश आत्राम, सुरेश भिवगडे,
प्रा. डॉ. विजया मुळे
सूर्यकांत मूनघाटे
भीमराव मनवर
ई.कवींनी सुंदर अशा रचना सादर केल्या.
या कार्यक्रमाला आर्वी शहरातील विविध बुद्ध विहारातील महिला उपासिकांची गर्दी होती.
याप्रसंगी उपस्थित पाहुणे मंडळीसाठी सामाजिक कार्यकर्त्या
शुभांगी सुजित भिवगडे यांच्या वतीने अल्पोपहार व चहा देण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जयंती उत्सव समितीचे महासचिव सुरेश भिवगडे यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन संडे मिशन आर्वी अंतर्गत व विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 वी जयंती उत्सव समिती आर्वी यांच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुजित भिवगडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले