ओम साई प्रतिष्ठान कॉलेज ऑफ फार्मसीचा १००% निकाल
.
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – पिंपळनेर येथील येथील ओम साई प्रतिष्ठान फार्मसी कॉलेजचा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२४ चा प्रथम आणि द्वितीय वर्षाचा निकाल १००% लागला आहे.
प्रथम वर्ष डी फार्मसी मध्ये सात्विक पवार शेकडा ७८. ५० टक्के , दिपक पठारे शेकडा ७७.८० टक्के , सुनील झावरे शेकडा ७७.३० टक्के हे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. द्वितीय वर्ष फार्मसी मध्ये साहिल शेख शेकडा ८३.७o टक्के , सानिया शेख शेकडा ८३.१८ टक्के , आदित्य कानगुडे शेकडा ८१ टक्के गुण मिळुन प्रथम,द्वितीय, आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. कॉलेज च्या सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे सर्व विश्वस्त, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी कौतुक केले आहे .