सामाजिक
कुलरचा शॉक लागुन युवकाचा मुत्यु
वरूड/तूषार अकर्ते
येथुन जवळच असलेल्या राजूराबाजार येथील युवक पंकज नामदेव कळमटे (२८) घरातील कुलर सुरु करायला गेला असता विद्युतचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या वेळी घरातच असणा-या त्याच्या वडिलांना ही बाब लक्षात येताच त्याला विद्युत प्रवाहा पासुन वेगळे करण्याचा प्रयत्न केला असता ते अपयशी ठरले.ही घटना घडताच घरच्यांनी आरडा ओरड केल्याने शेजा- यांनी सुद्धा या ठिकाणी धाव घेतली. लगेच विद्युत प्रवाह बंद करून पंकज ला गावातील खाजगी दवाखाण्यात नेण्यात आले. तेथून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले तेथे डॉक्टरानीं त्याला मृत घोषित केले. पंकज हा विवाहित होता. त्याचे पश्चात वडील पत्नी व दोन लहान मुली आहे. पंकज हा एकूलता एक मुलगा असल्याने कळमटे कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
1
+1
1
+1
1
+1