शैक्षणिक

शैक्षणिक गुणवत्तेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थांचा ज्ञानोदय शिक्षण संस्थेत गुणगौरव.

Spread the love

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सतत प्रोत्साहन मिळत रहावे, त्यांची शैक्षणिक प्रगती दिवसेंदिवस वाढून उज्ज्वल भविष्य घडावे , म्हणून नेहमीप्रमाणे ज्ञानोदय शिक्षण संस्थेमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पदके देवून गौरविण्यात आले.
ज्ञानोदय शिक्षण संस्थेत दि .1 जुलै रोजी इयत्ता 1 ली ते 9 वीच्या अ 1, अ 2 श्रेणी व 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या एकूण 87 गुणवंत विद्यार्थ्यांना विशेष पदके वितरण करुन त्यांचा गौरव करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची रुची वाढून त्यांच्यातील गुणवत्ता वाढते. या गौरवाने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची स्पर्धा लागते व त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळतो.
प्रा . राजेश खणकर सर व प्रा .छाया पठारे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 20 वर्षांपासून पारनेर तालुक्यात नावाजलेल्या ज्ञानोदय शिक्षण संस्थेत व किलबिल बालविकास मंदिर (पूर्व प्राथमिक सेमी इंग्रजी व इंग्रजी) शाळेने निघोज परिसरात उत्कृष्ट शैक्षणिक सेवा प्रदान करत हजारो मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवून लोकांचे प्रेम आणि विश्वास संपादन केलेला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे विद्यार्थ्यां इतकेच पालक व ग्रामस्थांनी कौतूक केले आहे .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close