क्राइम

लग्नाचे आमिष देऊन शारीरिक शोषण करणाऱ्या प्रियकाराचा प्रायव्हेट पार्ट कापून केला फ्लश 

Spread the love

पाटणा  / नवप्रहार डेस्क 

                 लग्नाचे आमिष देत मागील दोन वर्षांपासून कथित डॉक्टर तरुणीचे लैंगिज शोषण करणाऱ्या प्रियलाराला तरुणीने त्याचे प्रायव्हेट पार्ट कापत धडा शिकवला आहे. तिचे यावर समाधान न झाले की काय तिने त्याला फ्लश केले. जखमी तरुणावर रुग्णालायत उपचार और असून आरोपी तरुणीला डॉक्टरांनी अटक केली आहे. अभिलाषा तिवारी असे आरोपीचे नाव आहे.

प्राथमिक उपचारानंतर पोलिसांनी वेद प्रकाशला छपरा सदर रुग्णालयात दाखल केलं, तिथून डॉक्टरांनी त्याला गंभीर अवस्थेत पीएमसीएचमध्ये रेफर केलं. ही घटना बिहारच्या सारण जिल्ह्यातील मढौरा येथी आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टर अभिलाषा हिला ताब्यात घेतलं असून आवश्यक चौकशी सुरू आहे. या घटनेसंदर्भात महिलेनं आरोप केला आहे की, वॉर्ड नगरसेवक वेदप्रकाश सिंह आणि ती गेल्या दोन वर्षांपासून पती-पत्नीसारखं सोबत राहत होते. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. वेदप्रकाश गेल्या दोन वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून तिचं लैंगिक शोषण करत होता. मात्र, वेदप्रकाशचा हेतू संशयास्पद वाटल्याने तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला, पण वेदप्रकाशने लग्नाला नकार दिला.

यानंतर अभिलाषाने त्याला धडा शिकवण्याची योजना आखली आणि कटाचा एक भाग म्हणून त्याला सोमवारी मढौरा मेन रोडवर असलेल्या तिच्या खासगी नर्सिंग होममध्ये बोलावलं. अभिलाषाच्या फोननंतर वेदप्रकाश सोमवारी साडेदहाच्या सुमारास तिच्या नर्सिंग होममध्ये पोहोचला. महिलेने सांगितलं की, तिने प्रथम वेदप्रकाशला भुलीचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट चाकूने कापून वॉशरूममध्ये फ्लश करून टाकला.

घटनेची माहिती मिळताच मढौरा पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी जखमी वेदप्रकाश याला या बनावट नर्सिंग होममधून सोबत घेत उपचारासाठी मढौरा रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे त्याची प्रकृती गंभीर असल्याचं पाहून वेदप्रकाशला उपचारासाठी छपरा आणि तिथून पाटणा येथे रेफर केलं.

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी महिला अभिलाषा हिला ताब्यात घेतलं असून आवश्यक चौकशी करत आहेत. तिने वेदप्रकाश यांच्या फसवणुकीला कंटाळून असे पाऊल उचलल्याची कबुली दिली. वेद प्रकाश हा पुराणी बाजार येथील रहिवासी असलेल्या उपेंद्र सिंह यांचा 28 वर्षीय मुलगा असून तो मढ़ौरा नगरच्या वॉर्ड 12 मधील रहिवासी आहे. तर अभिलाष करताहा ही महिला वैशाली येथील वयोवृद्ध रहिवासी लालकांत गुप्ता यांची मुलगी आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close