निशुल्क भव्य सर्व रोग निदान, उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया शिबीरात 4786 रुग्णाची तपासणी व 971 रुग्ण रेफर
डॉ. गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी
(विनामुल्य महा आरोग्य शिबीर,डॉ महेश चव्हाण यांची माहिती)
– आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) स्व. आशादेवी चव्हाण बहुउद्देशिय संस्था, पहूर (ई.) यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क भव्य सर्व रोग निदान, उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन दिनांक 23 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत महेश भवन,कारंजा येथे करण्यात आले होते सदर शिबिरात 4786 रुग्णाची तपासणी व 971 रुग्ण रेफर करण्यात आले आहे.शिबिरात रुग्ण नोंदणी व तपासणी सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात आली. दुपारी साडेबारा वाजता औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाला अध्यक्ष म्हणून या शिबिराचे आयोजन कर्ते डॉक्टर महेश चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य गजाननभाऊ अमदाबादकर, गोरक्षणाचे आशिष तांबोळकर, सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे शाम सवई, पत्रकार किरण क्षार,योगेश यादव, बंडूभाऊ इंगोले,मोहम्मद मुन्नीवाले, हेमंत पापडे, मोहगवहानचे विठ्ठलराव लाड, गाडगे महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ राऊत, यावर्डीचे मोहन कदम, शिबिर प्रमुख डॉक्टर मंदार, रुग्ण संपर्क अधिकारी एल पी शिंगणे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्घाघाटन या कार्यक्रमाचे प्रास्तविक गजानन आमदाबादकर यांनी केले तर अध्यक्ष डॉक्टर महेश चव्हाण यांनी मोफत शस्त्रक्रिया शरीराचे उद्देश महत्त्व स्पष्ट केले.
सदर शिबीरात आरोग्य विषयक बाबीची तपासणी करून पुढील उपचारा करीता सावंगी मेघे येथे रेफर करण्यात आले.
मेडीसीन तज्ञ, हृदयरोग तज्ञ, सर्जरी तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ ,मुखरोग तज्ञ,नेत्ररोग तज्ञ,अस्थिरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ,बालरोग तज्ञ यासह अनेक डॉक्टर उपलब्ध होते.शिबिर स्थळावर नोंदणी मोफत,
डॉक्टरांनकडुन मोफत तपासणी व सल्ला व शिबीरानंतर भरती रुग्णांना सर्वसामान्य चाचण्या उदा. (एक्स-रे, रक्त, लघवी चाचणी, सोनोग्राफी) मोफत,भरती असणाऱ्या रुग्णांना खाट शुल्क, जेवण मोफत अतिविशिष्ट चाचण्या (सीटी स्कॅन, एम. आर. आय., इत्यादी चाचण्या) आवशकतेनुसार व डॉक्टरांच्या सल्यानुसार पुर्णतः मोफत, रुग्णांचा आजार सरकारी योजनेत येत असल्यास सरकारी योजनेला प्राधान्य देण्यात येईल. रुग्णांचा आजार महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आल्यास उपचार मोफत करण्यात येईल. तसेच भरती रूग्णांना हॉस्पीटल मध्ये जाण्याकरीता वाहनांची व्यवस्था मोफत राहील.