शहरात उन्हाळी क्रीडा व छंद शिबिर आम्रपाली ग्रुपचे आयोजन
तालुका प्रतिनिधी प्रकाश रंगारी
पंचशील बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने चांदुर रेल्वे शहरातील मिलिंद नगर येथे उन्हाळी ग्रीष्मकालीन क्रीडा व छंद शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे.
दि *.2/5/2024 ते 12/5/2024* पर्यंत शिबिराचे आयोजन आम्रपाली ग्रुपच्या वतीने लुंबिनी बौद्ध विहार येथे करण्यात आले आहे. यासाठी वयोगट *4 ते 14 वर्षे* ठेवलेला असून शिबिरामध्ये लहान मुलांना गाणे,गप्पागोष्टी, हसत खेळत शारीरिक व्यायाम आणि व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन करून, उन्हाळी छंद शिबिरामध्ये अनेक प्रकारचे नाटक, लहान मुलांना संस्कार वर्ग घेण्यात येणार आहे. योगा, कराटे, स्टेज, डेरिंग, डान्स,रंगकाम असे विविध प्रकारचे शैक्षणिक मार्गदर्शन त्यावेळी देण्यात येणार असून शहरातील नामवंत असे प्रशिक्षक यावेळी उपस्थित राहून त्यांना मार्गदर्शन करतील.
शहरातील मुला मुलींना या शिबिराचा लाभ घेण्याचे आव्हान पंचशील बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रफुल मकेश्वर व त्यांचे सहकारी सदस्य रूपाली वानखडे, कावेरी आठवले, वैशाली गडलिंग, रोशनी मेश्राम, सायली गवई यांनी केले आहे.