वाहनासह ३ लाख २९ हजाराची दारु जप्त, दोघांना अटक
एका मोठ्या राजकीय पक्षाची महिला पदाधिकारी वाहनात असल्याची चर्चा
,दि.११:- वर्धा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने मंगळवारी (ता.१०) कोम्बींग ऑपरेशन दरम्यान केलेल्या नाकाबंदी मध्ये पोलीसांनी चारचाकी वाहनासह ३ लाख २९ हजार रुपयाची विदेश दारु जप्त करुन दोन आरोपींना अटक केली आहे. तर, या वाहनात एका बड्यापक्षाची महिला जिल्हा पदाधिकारी सुध्दा प्रवास करीत होती अशी जोरात चर्चा आहे.
स्वप्नील अरुण कृपाले (२७) राहणार जनता नगर व शैलेश बंडू भिवगडे (२८) राहणार आंबेडकर वार्ड असे आरोपींची नावे आहेत. दारु वाहतुकीवर निर्बंध आणण्याकरीता पोलीसांनी कोंम्बींग ऑपरेशन दरम्यान येथील टि पॉइंटवर मंगळवारी (ता१०) नाकाबंदी करुन वाहनाची तपासणी सुरू केली. यावेळी एम. एच. १७ एई ०११० क्रमांकाच्या तवेरा वाहनाची झडती घेतली असता वाहनाच्या मागच्या सिटवरील एका खर्ड्याच्या खोक्यामध्ये रॉयल स्टॅग कंपनीच्या १८० एमएलच्या ९६ निप्पा आढळुन आल्याने त्या जप्त करुन आरोपींना अटक केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यशंवत सोळसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बांबर्डे या उपस्थितीमध्य पोलीस हवाल