विभागीय आयुक्त कार्यालय मार्फत अंजनगाव सुर्जी नगरपालिकाच्या लेखा विभागाचे ऑडिट करण्याची मागणी
कोरोना काळातील भ्रष्टाचाराला मूठ माती कशी ?
अंजनगाव सुर्जी ( प्रतिनिधी)
कोरोना काळात मोठ्या प्रमाणात अंजनगाव सुर्जी नगरपालिकेच्या लेखा विभागातून मोठ्या प्रमाणात बिल काढण्यात आली असेल त्या संपूर्ण बिलाची विभागीय आयुक्त कार्यालय मार्फत स्थानिक नगरपालिकेचे लेखा विभागाचे ऑडिट करण्याची मागणी पावर ऑफ मीडिया संघटनेने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे केली असून लेखा विभागातून मंजूर झालेल्या प्रत्येक बिलाची कसून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, कोरोना काळात अंजनगाव सुर्जी शहरात विविध उपायोजना करण्याकरिता स्थानिक नगरपालिकेला शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला होता. जो निधी बांधकाम विभाग तसेच आरोग्य विभागावर खर्च करण्यात आला. कोरोना काळातील पद्धतशीरपणे बिल काढण्याचा उपयोग नगरपालिका प्रशासनाने केला. या काळात मोठ्या प्रमाणात नगरपालिका प्रशासनाने बिल काढली व सदर बिल बिनधास्तपणे अंजनगाव नगरपालिकेच्या लेखा विभागातून मंजूर करण्यात आली. कोरोना काळात एकूण शासनाकडून किती निधी मंजूर झाला व व तो अंजनगाव सुर्जी शहरात कुठे कुठे खर्च करण्यात आला याबाबतची सर्व माहिती पावर ऑफ मीडियाचे अध्यक्ष मनोहर मुरकुटे यांनी दिनांक १० / ५ / २०२१ मध्ये एका पत्राद्वारे मागितली होती. परंतु नगरपालिका प्रशासनाने आज पर्यंत सदर माहिती उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे निश्चितपणे कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात बिल काढण्यात भ्रष्टाचार झाल्याची चर्चा शहरात असून नागरिकांमध्ये शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहे. कोरोना काळामध्ये स्थानिक नगरपालिकेच्या लेखा विभागातून मोठ्या प्रमाणात मंजूर झालेल्या प्रत्येक बिलाची कसून चौकशी करण्याची मागणी तसेच अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील खास पथकाद्वारे येथील नगरपालिकेतील लेखा विभागाचे तातडीने ऑडिट करण्याची मागणी पावर ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात आली असून त्यामुळे कोरोना काळातील काढलेल्या बिलाचे गौडबंगाल समोर येणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.