भगव्या झेंड्याच्या अपमान संदर्भात विश्व हिंदू परिषद बजरंग दल कारंजा च्या वतीने शासन दरबारी निवेदन सादर
कारंजा / प्रतिनिधि
आज दिनांक 21 मार्च 2024 दुपारी दोन वाजता विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखा कारंजाच्या वतीने शासन दरबारी निवेदन देण्यात आले, यामध्येकारंजा नगरपरिषद चे मुख्य अधिकारी श्री दीपक मोरे व l कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री दिनेशचंद्रजी शुक्ला यांना निवेदन देऊन यांच्यामार्फत माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्या सेवेची निवेदन सादर केली की, दिनांक 18 मार्च 2024 पासून संपूर्ण देशात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे या संबंधाने कारंजा शहरात कारंजा नगरपालिका प्रशासन कडून शासनाची कोणतेही आदेश किंवा निर्देश नसताना संपूर्ण शहरात घरावर लावलेले श्रीरामाचे भगवे ध्वज व मंदिरावरील लावलेले भगवे ध्वज व शहरातील अनेक रस्त्यावरील लावलेले भगवे ध्वज तसेच पताका आचारसंहिता लागू झाली आहे असे दाखवून दिनांक 19 मार्च 2024 रोजी नगरपरिषद प्रशासनाने विशिष्ट समाजातील कर्मचाऱ्यांनी सर्व पाचशे ते सहाशे ध्वज पताका विडाकाठीच्या साह्याने फाडून व काढून टाकले यामध्ये हिंदू धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहे याकरिता, कारंजा नगर परिषद चे मुख्याधिकारी श्री दीपक जी मोरे व कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांना असे निवेदन देते वेळी मंगेश कडेल अध्यक्ष विश्व हिंदू परिषद बजरंग दल कारंजा व रघुजी वानखडे अरुणजी बिकट मंगेशजी मुंडे दीपक फाळ हितेश चौकसे आशिष शर्मा सवीषजगताप आदी बजरंग दल पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.