डॉ. रिपल राणे 25 फेब्रुवारीपासून अमेरिका भेटीवर
शिकागो येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रांतपाल परिषदेच्या चर्चासत्रात होणार सहभागी
आर्वी / प्रतिनिधी
आर्वी येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ व विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे डॉ रिपल राणे येत्या २५ फेब्रुवारीला अमेरिकेला रवाना होणार असून, तिथल्या इलिनोईस प्रांतातील प्रसिद्ध शहर शिकागो येथे लायन्स क्लब इंटरनॅशनल द्वारा आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित पाच दिवसीय प्रांतपाल परिषद- चर्चासत्रात सहभागी होणार आहे.
आपल्या अमेरिका दौऱ्यात ते चर्चासत्रातील सहभागासोबतच लायन्स क्लब इंटरनॅशनल च्या ओक ब्रुक शहरातील मुख्य कार्यालयाला सुद्धा भेट देणार आहे. डॉ राणे हे आर्वी सारख्या छोट्या व ग्रामीण भागातून प्रांतपाल पदावर पोहोचलेले पहिलेच प्रांतपाल आहेत.
मागिल वर्षी नागपूर येथील हॉटेल ली- मेरिडीयन येथे संपन्न झालेल्या डिस्ट्रिक्ट कॉन्व्हेन्शनमध्ये डॉ रिपल राणे यांची प्रचंड मताधिक्याने प्रांतपाल पदावर निवड झाली होती. हे सर्वश्रुत आहे.
डॉ रिपल राणे यांचा प्रांतपाल पदावरील कार्यकाळ आगामी २०२४-२५ हे वर्ष असून, प्रांतपाल पदाचा त्यांचा शपथविधी येत्या जून महिन्यात ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न शहरात मोठ्या थाटात संपन्न होणार आहे.
आपल्या कार्यकाळात ते नागपूर, अमरावती ,भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ व गडचिरोली या आठ जिल्ह्यांचे प्रांतपाल म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
आपल्या कर्तुत्वाने आर्वी शहराच्या गौरवात भर टाकणाऱ्या डॉ रिपल राणे यांच्या आगामी वाटचालीसाठी तसेच त्यांच्या अमेरिका दौऱ्यासाठी लायन क्लब आर्वीच्या सर्व सदस्यांनी तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना, सर्व डॉक्टर्स संघटना यांनी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.भाविवाटचालिसाठी खूप खूप शुभेच्छा..💐💐🙏🏻💐💐🎄🎄