सामाजिक

ठाणा पेट्रोलपंप येथे कामगार नोंदनी कामात नियमांची पायमल्ली

Spread the love

बोगस कामगाराचा भरणा
भंडारा : तालुक्यातील ठाणा पेट्रोल पंप येथे इमारत बांधकाम व ईतर बांधकाम कामगार योजनेचे लाभ देण्यासाठी मागील काही दिवसापासून नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे .मात्र यामध्ये अर्धेहून अधिक लाभार्थी हे योजनेचे निकष पूर्ण करीत नसून अश्या अयोग्य लाभार्थ्यांची नोंदणी झाल्याने नियमांची पायमल्ली झाल्याचे उघडकीस आलेले आहे.
महाराष्ट्र शासनाकडून गृहपयोगी वस्तू आणि संरक्षण किटचे वाटप जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरू आहे.
महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या कामगारांचे भविष्य उज्वल होण्याकरिता महाराष्ट्र शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत यापैकी बांधकाम कामगार योजना ही एक योजना आहे. या योजनेमार्फत बांधकाम करणाऱ्या कामगारांना रोजगार देणे, सामाजिक सुरक्षा देणे, कामगाराच्या मुलांचे शिक्षण करिता स्कॉलरशिप देणे, कामगाराच्या आरोग्यासाठी मदत देणे अशा अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना, महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांकरिता सुरू केलेल्या आहेत. बांधकाम कामगार योजनेमार्फत कामगारांना आर्थिक मदत आणि जीवनावश्यक वस्तू सुद्धा दिल्या जातात. या आशेने ठाणा पेट्रोल पंप येथे चालू वर्षात गावातील प्रत्येक कुटुंबातील नागरिकात या योजनेत नाव समाविष्ट करण्याची स्पर्धा मोठया प्रमाणात सुरू झाली असून यामध्ये अयोग्य लाभार्थ्यांचा भरणा अधिक असल्याचे चित्र ठाणा (पेट्रोलपंप) येथील इमारत बांधकाम कामगारांच्या नोंदणी वरून दिसून आले आहे. या योजनेमध्ये बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० किंवा अधिक दिवस काम केल्याचे बांधकाम ठेकेदाराचे प्रमाणपत्र ,आधार समंती फार्म, व स्वयं घोषणापत्र ,इत्यादी कागदपत्राची पूर्ततेसह सादर करून ऑनलाईन पद्धतीने याची नोंदणी केली जाते.
मात्र ठाणा पेट्रोल पंप येथे कुठल्याही कामावर न जाणारे तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती सधन आहे व ज्यांच्याकडे चार चाकी वाहने आहेत अशाही व्यक्तींनी या योजनेमध्ये नोंदणी केलेली आहे. अनेकांनी याचा लाभही घेतला असल्याचे दिसून येते मात्र अयोग्य लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार नाही व योग्य लाभार्थ्यांना याचा लाभ कसा मिळेल याकडे स्थानिक यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
………. क्रमशः…..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close