सुरेंद्र गोठाणे यांची तेली समाज विभागीय समीक्षक म्हणून नियुक्ती
आर्वी येथील सामाजिक कार्यकर्ते व शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक क्षेत्रात अनन्यसाधारण कामगिरी करणारे माझे ज्येष्ठ सहकारी व मार्गदर्शक प्राध्यापक श्री सुरेन्द्रभाऊ मु.गोठाणे यांची श्री संताजी अखिल तेली समाज संघटना नागपूर मध्ये”विभागीय समिक्षक नागपूर”या पदावर नियुक्ती सर्वानुमते झाल्याने समाजाच्या सर्वच क्षेत्रांत त्यांच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहेत. अतिशय सालस,निगर्वी, मितभाषी, सहकारी स्वभावाचे असलेले प्राध्यापक गोठाणे यांनी या पुर्वी ग्रंथालय या विषयावर नागपूर विद्यापीठात शोध प्रबंध सादर करुन आपल्या ज्ञानाच्या कक्षा व्यापक केल्या आहे. त्यांच्या नियुक्तीचे प्रदेशाध्यक्ष तथा संस्थेचे संस्थापक, मार्गदर्शक,सर्वेसर्वा श्री *अनिलभाऊ* *बजाईत**प्रदेश उपाध्यक्ष श्री अविनाश ल टाके,नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्राध्यापक श्री प्रशांतभाऊ सव्वालाखे,श्री जयकुमार दादा बेलखडे(समाजभूषण) श्री अरुण कहारे, सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष श्री भरत जैसिंगपुरे, प्रकाशभाऊ जैसिंगपुरे, रविंद्र गोडबोले, प्रकाश गुल्हाणे, सुनील टाके,अनुप जैसिंगपुरे, संदीप लोखंडे, विशूभाऊ आगलावे, प्रविण शेलोकार, पंकज साकोरे, संजय चिंधेकर, श्री अशोकराव जिरापुरे, उमेशभाऊ भुसारी, अरुणभाऊ जैसिंगपुरे, गुणवंतजी गुल्हाणे, पत्रकार श्री सतीशभाऊ शिरभाते, मनोज गोडबोले, पंकज गोडबोले, ज्ञानेश्वर जैसिंगपुरे, अतुल जैसिंगपुरे, संजय गोठाणे, ज्ञानेश्वरभाऊ आसोले, जीवनभाऊ आसोले, प्राध्यापक श्री मनोजभाऊ आगरकर, अनिल गुल्हाणे, राजेशभाऊ टाके(गुल्हाणे)मनोजभाऊ गुल्हाणे, प्रवीण बिजवे, प्रमोद गाठे,अनिल बिजवे, विनायक जैसिंगपुरे, हेमंत गुल्हाणे, इत्यादी समाजबांधवांनी केले असुन भाविवाटचालिसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.