राजकिय

आर्वीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा- काँग्रेस ला दे धक्का 

Spread the love
पंकज नाकतोडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश ; शहर अध्यक्ष पदी नियुक्ती 
आर्वी  / नवप्रहार मीडिया 
             आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन अनेक युवक राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेत आहेत. काँग्रेस पक्षाला पुन्हा राष्ट्रवादीने दे धक्का दिला आहे. काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक कार्य केलेले पंकज नाकतोडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे.
 वर्धा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे युवक प्रदेश सरचिटणीस कन्हैया जी कदम यांची वर्धा जिल्हा निरीक्षक पदी नियुक्ती झाल्यावर पहिल्यांदा स्थानिक विश्राम गृहात युवक ची आढावा बैठक पार पडली यावेळी प्रामुख्याने माजी केंद्रीय मंत्री सुबोध  मोहिते,वर्धा जिल्हाध्यक्ष शरद  शहारे प्रदेश संघटक सचिव राणा रणनवरे, युवती जिल्हाध्यक्ष शिवानी रननवरे, महिला शहर जिल्हाध्यक्षा भावना वाडीभस्मे, आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे, अ. कामगार जिल्हाध्यक्ष आशिष मेश्राम,प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी काँग्रेस पार्टीत अनेक वर्ष संघटनात्मक काम केलेले आणि काही दिवसा आधीच आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वा वर विश्वास ठेवत युवक जिल्हाध्यक्ष मयूर डफळे व युवक आर्वी विधानसभा अध्यक्ष कमलेश चिंधेकर यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन युवक राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केलेले पंकज नाकतोडे यांना आर्वी युवक शहर अध्यक्ष पदी नियुक्त केले यावेळी जावेद भाई, विशाल साळवे, अशोकराव धानोरकर, अशपाक शेख, दिलीपराव बोरकर, अरुणराव उमरे, महिला ग्रामीण जिल्हाध्यक्षा अश्विनी शिरपूरकर, रोजगार व स्वयं रोजगार जिल्हाध्यक्षा रेखा वानखडे, मीना बळवटकर, शुभांगी कलोडे अर्चना धवणे, सोनाली जैन सोनू चिंधेकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close