पंढरीच्या वारीत डॉ.श्रीकांत पठारे सहकाऱ्यांसमवेत तालुक्यातील सर्वच दिंड्यांमध्ये करत आहेत वारकऱ्यांवर मोफत व मनोभावे औषोधपचार .
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – दरवर्षीप्रमाणे आषाढी वारीत पंढरपुरला जाणाऱ्या पारनेर तालुक्यातील विविध गावातील वैष्णवांच्या मेळ्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख डॉ . श्रीकांत पठारे व त्यांचे सहकारी संतोष साबळे, प्रशांत निंबाळकर, मोहित जाधव, ऋषी माने, अभिजीत घोलप, विराज पठारे हे मनोभावे मोफत औषधोपचार करत आहेत.
तालुक्यातील पिंपळनेर, वडझिरे, बाभुळवाडे, पोखरी, देसवडे, पुणेवाडी, कान्हुर पठार, वडगाव दर्या, गुणोरे, निघोज, लोणीमावळा, सावरगाव, पठारवाडी, पानोली, सूपा परिसरातील शेकडो दिंड्या दरवर्षीप्रमाणे आषाढी वारीसाठी पंढरपुरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाल्या आहेत. या दिंड्यांना दरवर्षी डॉ.श्रीकांत पठारे आरोग्यसेवेच्या माध्यमातुन सेवा देत असतात, वैष्णवांच्या या मेळ्यात आरोग्यसेवा करणे, हीच आमची दरवर्षीची पंढरीची वारी असते व या सेवेत आम्ही साक्षात पांडुरंगाचे दर्शन घेतो असे डॉ.श्रीकांत पठारे आवर्जून म्हणतात.
तालुक्यातील हजारो वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य पांडुरंगाने मला दिले , यातच माझे जीवन धन्य आहे आणि जीवात जीव आहे, तोपर्यंत ही सेवा आम्ही दरवर्षी देत राहू , असेही डॉ.श्रीकांत पठारे म्हणाले. सर्वच दिंड्यांना प्रस्थानापासून लागणारी आरोग्यसेवा व इतर मदत देण्याचे काम अनेक भक्त करत असतात आणि त्याच सेवेतून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो .तसेच ही सेवा म्हणजे अगदी अल्पशी असते , परंतु देवाच्या भक्तांच्या या सेवेत मिळणारे सुख कशातच नाही, अशी भावना आमच्या सहकाऱ्यांची असते ,असे डॉ.श्रीकांत पठारे हे सांगितले .