सामाजिक

आर्वी येथे दिवंगत किरण पाटणकर यांच्या स्मृतीला अनुसरून श्रद्धांजली कार्यक्रम

Spread the love

आर्वी / प्रतिनिधी

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती महोत्सव समिती आर्वी* द्वारा आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवमुक्तीचे तेजस्वी आंदोलन गावागावात पोचविण्यासाठी स्वतःला झोकून देणारे लोककवी नागोराव पाटणकर यांच्या कन्या व प्रख्यात बौद्ध-भीम गीत गायिका किरण पाटणकर-रोडगे यांचे ५ फेब्रुवारी रोजी आजाराने निधन झाले. त्या ६२ वर्षांच्या होत्या. आघाडीचे आंबेडकरी प्रबोधनकार गायक कवी प्रकाशनाथ पाटणकर यांच्या भगिनी आहेत.
भारतातील ख्यातनाम गायिका व कव्वाल दिवंगत किरणताई पाटणकर नागपूर यांचा मृत्यू झाल्यामुळे आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री ८.०० वाजता सिद्धार्थ बुद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर आर्वी या ठिकाणी आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमासाठी जयंती समितीचे अध्यक्ष सुजित भिवगडे प्रा डॉ विजयाताई मुळे, प्रा पंकज वाघमारे सुखदेवराव नंदागवळी रहूपाल नाखले, प्रमोद चौरपगार, गौतम मेश्राम, अक्षय भगत, गौतम कुंभारे, आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी सुत्र संचालन व प्रास्ताविक जयंती महोत्सव समितीचे महासचिव सुरेश भिवगडे यांनी केले
याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण करून
धम्मपालन गाथा घेउन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला…..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close