Uncategorized

सारडा महाविद्यालयात जाॅब अपाॅरच्युनिटीज अंडर इंटरपृनरशिप डेवलपमेंट वर कार्यशाळेचे आयोजन

Spread the love

महाविद्यालयातील आयक्यूएसी , वूमेन डेवलपमेंट सेल ,आरसीएम बिजनेस व सरोजदेवी फाउंडेशन यांच्या संयुक्तिक कार्यशाळेत 100 हुन अधिक नागरिकांचा सहभाग


अंजनगाव सुर्जी -, मनोहर मुरकुटे

स्थानिक श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आयक्यूएसी, वूमेन डेवलपमेंट सेल आणि आरसीएम बिज़नेस व सरोजदेवी फाउंडेशन यांच्या वतीने जाॅब अपाॅरच्युनिटीज अंडर इंटरपृनरशिप
डेवलपमेंट कार्यशाळेचे (उद्योजकता विकास अंतर्गत नौकरिच्या संधीवर कार्यशाळा) आयोजन दिनांक १४ जानेवारी २०२४ ला करण्यात आले. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आर सीएम बिज़नेस च्या मिस पुजा अरोरा ( पंजाब ) व श्री राजेश कोंडे यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयातील इंग्रजी विभगाच्या प्रमुख डॉ. बीना राठी,वूमेन डेवलपमेंट सेल च्या समन्वयक डॉ. अंशुमती पेंडोखरे, आय.क्यू. ए.सी. चे समन्वयक तथा आयोजन सचिव डॉ मंगेश डगवाल, सेमिनारचे आयोजन सहसचिव डॉ. इंदल जाधव ,आयोजन सहसचिव डॉ. ममता येवतकर व आर सीएम बिजनेस चे नितिन धोटे हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यशाळेत पूजा अरोरा यांनी उपस्थित विद्यार्थी व गावातील महिला व पुरुष यांना जॉब अपाॅरटुनिटी च्या उपलब्धते बाबत पहिल्या सत्रात विस्तृत मार्गदर्शन केले. दुसर्‍या सत्रात श्री राजेश कोंडे यांनी उपस्थितांना बिजनेस कसा करू शकतो यावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रास्ताविकात डॉ. मंगेश डगवाल यांनी कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्टे व रोजगारच्या उपलब्ध संधी यामधून मिळतील असे सांगितले. सदर कार्यशाळेला महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व आरसीयम संबंधीत जुळलेले 100 उन अधिक लोक उपस्थित होते. कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वशिष्ठ चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यशाळेचे संचालन डॉ. ममता येवतकर यांनी केले तर आभार श्री नितीन धोटे यांनी मानले. कार्यशाळेच्या आयोजनाकरिता आयक्यूएसी व वुमन डेवेलपमेंट च्या सदस्यांनी सहकार्य केले. कार्यशाळेनंतर सहभागी नागरिकांनी महाविद्यालयातील औषधी वनस्पती उद्यानास भेट देऊन वनस्पतींची माहिती डॉ. मंगेश डगवाल यांचे कडून जाणून घेतली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close