कवी सुरेश भिवगडे यांच्या कविता संग्रहाचे थाटात प्रकाशन
मान धम्मप्रचारक व कवी सुरेश किसनराव भिवगडे यांच्या बहुचर्चित मानवतेचे प्रचारक या कविता संग्रहाचे आर्वी येथे झाले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन
मानवतेच्या रक्षणासाठी नैतिक मूल्यांची पेरणी करणारा कवितासंग्रह म्हणजेच मानवतेचे प्रचारक
यशोदाताई व्यंकटेश आत्राम यांचे प्रतिपादन
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : दिनांक १४ जानेवारी २०२४ ला सेलिब्रेशन हॉल आर्वी येथे
*१ जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिवस, ३ जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती ८ जानेवारी जागतिक धम्म ध्वज दिवस, ९ जानेवारी शिक्षिका फातिमा शेख जयंती व १२ जानेवारी मा जिजाऊ जयंती व १४ जानेवारी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन संयुक्तं कार्यक्रमाच्या अनुषंगाने
एक दिवसीय समाज प्रबोधन कार्यक्रम एकपात्री नाटक व आंबेडकरी कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते
मानवतेचे प्रचारक राज्य स्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा तसेच राज्यस्तरीय काव्य पुरस्कार वितरण.
सामुहिक बुद्ध वंदना भंते करूणा किर्ती स्थविर यांचे हस्ते पार पडली त्यानंतर उद्घाटन समारोह पार पडला
मान.यशोदाताई व्यंकटेश आत्राम
सामाजिक कार्यकर्त्या व साहित्यिका मान.यशोदाताई व्यंकटेश आत्राम
यांच्या हस्ते मानवतेचे प्रचारक या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून
मान. राहुल गजरे
मान. प्रकाश जिंदे वर्धा
प्रा डॉ विजयाताई मुळे
प्रा डॉ अनिल भगत
रवि भीमके कवी सुरेश भिवगडे
उन्नता ढाकणे सुनील ढाकणे
नलिनी नरेन्द्र भिवगडे तसेच
या कार्यक्रमाप्रसंगी मान. केवल जीवनतारे पत्रकार व सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र व साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन यांची विशेष उपस्थिती होती.
सुत्र संचालन सपना भिवगडे
प्रास्ताविक निकिता सुनील ढाकणे तर
आभार सुरेश भिवगडे यांनी मानले
बहुचर्चित असणारा मानवतेचे प्रचारक या कवितासंग्रहाचे आयोजित कार्यक्रमात प्रकाशन झाले सुरेश भिवगडे यांचा मानवतेचे प्रचारक हा भावनांचा खळाळ घेऊन आलेला कविता संग्रह
धर्मापेक्षाही श्रेष्ठ आहे आपले भारतीय संविधान आणि युद्ध नको बुद्ध हवा हे भिवगडे यांची अनुभवाची तळस्पर्शी निर्णायक भाषा व तिचे झेपावणे या कवितेतील आशय व्युहाच्या
कडा सुस्पष्ट करून जातात माझा मार्ग चुकला असे मी कधीच म्हणणार नाही अशा दृढनिश्चयाने व धिटाईने परिवर्तनाचा लढा गतिमान करणारा आणि वर्तमानाचे पूर्ण भान असलेला एक सजग प्रहरी म्हणून भिवगडे काव्य प्रांतात दाखल झालेले आहेत एका सुसंस्कारी व्यापक समंजसपणाच्या पोटी जन्माला आलेली ही कविता मानवतेच्या प्रचाराचा शंखनाद ठरेल
मान. यशोदाताई व्यंकटेश आत्राम यांची कवितेचे वेगळेवेगळे अंग प्रदर्शित करणारी प्रस्तावना गोंडी व मराठी भाषेत लाभलेली आहे
तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक व कवी प्रा. डॉ. विनायक तुमराम यांचा ब्लर्ब या कविता संग्रहाला आहे तर मुखपृष्ठ चित्रकार व कवी संजय ओरके यांचे लाभले आहे
निळाई प्रकाशन नागपूरच्या वतीने हा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे
या आंबेडकरी लोककला महोत्सवाप्रसंगी एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले होते
आंबेडकरी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांची मांडणी करणारा एकपात्री प्रयोग : निर्धार हे नाटक
सादरकर्ती: प्रणेती राजेश डंभारे या मुलीने सादर केला
तसेच
आंबेडकरी चळवळीचे एकतेचे सूत्र घेउन
चळवळ , या नाटकाचे लेखक
केवल जीवनतारे यांच्या उपस्थितीत
पल्लवी केवल जीवनतारे यांनी चळवळ हे नाटक सादर केले
तसेच वसुंधरा हे छोटेखाणी नाटक
आशा चौधरी शिक्षिका जि. प. यांनी सादर केले.
यावेळी मानवतेचे प्रचारक राज्य स्तरीय पुरस्कार वितरण रिल्स स्टार व प्रतिभावंताचा सत्कार सोहळा पार पडला यात
रिल्स स्टार ट्विंकल पटले भोपाल
रिल्स स्टार साक्षी चिंचखेडे अमरावती
रिल्स स्टार कवी व प्रबोधनकार मंगेश नाईक अमरावती
रिल्स स्टार भीमकन्या गुंजन मंगला ज्ञानेश्वर मेश्राम अमरावती
चीफ प्रेसिडेंट बोधिसत्व युवा प्रतिष्ठान अमरावती
रिल्स स्टार पुजा भोंगळे अमरावती
रॅपर क्षितीज लोणारे नागपूर
निरज जामगडे (मायकेल) नागपूर सहकलाकार
झूंड, जयंती, घर बंदूक बिर्याणी)
गायक स्वप्नील गणवीर अमरावती
सचिन मनवरे निलिमा भगत
सम्यक गाडगे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
याचवेळी
आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या विविध
सामाजिक संस्था व संघटनांचा सन्मान करण्यात आला.
यात संविधान युवा मित्रपरिवार आर्वी
ऑल इंडिया समता सैनिक दल शाखा आर्वी
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका आर्वी
आदर्श एकता सामाजिक संघटना आर्वी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती आर्वी
पंचशील युवा ग्रुप मित्र परिवार आर्वी
आंबेडकराईट सोशल क्लब आर्वी
टिपू सुलतान ग्रुप आर्वी
परमसंघ सेवाभावी बहुउद्देशीय संस्था पिंपरी पुनर्वसन भाईपुर
पंचशील धम्म यात्रा आयोजक
बौद्ध संस्कृती प्रचार प्रसार व संस्कार बहुउद्देशीय समिती तिवसा,
सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वी,
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले निशुल्क (अभ्यासालय )वाचनालय आर्वी,
समता साहित्य मंच आर्वी / आष्टी,
निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवार नागपूर ,
पथदर्शक परिवार
आदीचा सन्मान करण्यात आला.
याच प्रसंगी
मानवतेचे प्रचारक राज्य स्तरीय काव्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले यात
मला श्वास घेता येत नाही कवितासंग्रहाचे
कवी प्रशांत तुळशीदास खैरे मुक्काम पोस्ट गडचांदूर जिल्हा चंद्रपूर तर
सम्यक चेतनेचे संदर्भ जीर्ण होत नाहीत या कवितासंग्रहाचे
कवी अरविंद पाटील वर्धा यांना तर
अस्मिता या कविता संग्रहाच्या
कवियित्री संघमित्रा गेडाम नागपूर तसेच
आक्रोश या कविता संग्रहाचे
कवी पि. के पवार सोनाळा तहसील संग्रामपूर जिल्हा बुलढाणा या कवींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी रॅपर क्षितिज लोणारे यांनी आपला न्यु रॅप साँग सादर केला तर गायक स्वप्निल गणविर यांनी आपले भीम शंभरी सोन महूच्या मातीच हे गित सादर केले. याशिवाय सचिन मनवरे नीलिमा भगत व सम्यक गाडगे यांनी सुध्दा गीत सादर केले.
या कार्यक्रमाला मोठया प्रमाणात साहित्यिक कवी विचारवंत सेलिब्रिटी रिल स्टार गायक उपस्थित होते. या कार्यक्रमाला खुप मोठया संख्येने लोक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मदत करणाऱ्या व सहयोग देणाऱ्यांचे आभार आयोजक सुरेश भिवगडे धम्म जागृती युवा संघातर्फे मानण्यात आले.