भातकुली ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर…
स्थानिक विधानसभा – लोकसभा प्रतिनिधींनी फिरवली पाठ
नितीन कदम यांच्या पाठपुराव्यामुळे रूग्णालय दूराव्यवस्थेची पोलखोल..!
अमरावती / प्रतिनिधी
राज्य सरकार, केंद्र सरकार आणि जिल्हा परिषद स्व उत्पन्नातून दरवर्षी सरकारी आरोग्य सेवेवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करते. मात्र, त्याचा लाभ गरजवंतांना मिळणार नसेल, वेळेवर रुग्णांना आरोग्य सुविधा मिळणार नसतील तर त्याचा उपयोग काय ? असा सवाल उपस्थित झाला आहे.*
*भातकुली ग्रामीण रुग्णालययाचे जाळे सर्व बडनेरा विधानसभा मतदार संघात विखुरलेले आहे.मात्र, हे जाळे कधीच विरले असून सर्वसामान्यांना आरोग्य सेवेसाठी खासगी ठिकाणी उंबरे झिजवण्याची वेळ आली आहे. सरकारने आतापर्यंत गरोदर माता, जन्माला येणारे बालक, अंगणवाडी बालक, शालेय बालक ते महाविद्यालयीन तरूणांपर्यंत सर्वांसाठी वेगवेगळ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून • दिलेल्या आहेत. कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबासाठी राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केलेली आहे. परंतु ते सुद्धा कागदापूर्तेच मर्यादित…!*
*महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या ग्रामीण रुग्णालय भातकुली हे आरोग्य सेवा, अकोला मंडळ, अकोला यांच्या संचालनात येते.*
*भातकुली तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. त्यामुळे दळण वळणाची समस्या असते. त्या मुळे गावातच प्राथमिक उपचार व्हावे म्हणून जिल्हा ग्रामीण रुग्णालय नागरिकांच्या आरोग्याचा साठी सज्ज असणे आवश्यक असताना तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या भातकुली येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी तालुक्यातील नागरिकांसाठी अतिशय अत्यावश्यक असणाऱ्या आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले असून आरोग्य विभाग हे सद्यस्थितीत सलाईनवर आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या या उदासीनतेच्याबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.*
*पावसाळ्यात ग्रामीण भागात विविध साथ रोगांचा फैलाव होत असतो. यामुध्ये टायफॉईड, डेंग्यू, कावीळ, मलेरिया या रोगांचा प्रादुर्भाव अधिक असतो. टायफॉईड किंवा मलेरियाची लागण झालेल्या रुग्णाला वेळीच उपचार मिळणे आवश्यक आहे. यासाठीच शासकीय ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आली आहेत . या ठिकाणी कमीत कमी खर्चात रुग्णांवर उपचार केले जावेत असे शासनाच्या आरोग्य विभागाचे संकेत आहेत. मात्र भातकुली तालुक्यातील जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथील गैरसोय बघता ग्रामस्थांना उपचार घेण्यासाठी नाईलाजास्तव शहरी भागांत यावे लागते. या ठिकाणी रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने शासनाने लाखो रुपये खर्च करून उभारलेले शासकीय रुग्णालये कशासाठी? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.*
*सदर भातकुली तालुक्यातील जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथील उदासीन व्यवस्था स्थानिक मतदार संघातील (विधानसभा – लोकसभा) लोकप्रतिनिधींना कल्पना असतानासुद्धा जाणीवपुर्वक टाळत असल्याचं चित्र स्पष्ट होते आहे. संबधीत रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांना विचारांना करायसाठी अधिकारीच वेळेवर हजर नसल्याचे लक्षात आले. यामुळे जिल्हा ग्रामीण रुग्णालय भातकुली ‘राम – भरोसे’ असल्याचे दिसून येते.*
*येथिल वैद्यकीय अधिकारी हे महिन्यातून एकदा रुग्णालयात हजर असतात. आमचे प्रतिनिधि विचारणा गेले असताना संबधीत अधिकारी त्यांची उपस्थिती कागदस्वरुपी असताना उपलब्ध/ हजर नसल्याचे लक्षात आले. येथिल रुग्णालयात परिचारिकेची २ पदे अजूनही रिक्त आहेत. फार्मसिस्ट सुद्धा येथे रिक्त पद म्हणुन वावरतय. एक्स-रे व सोनोग्राफी व्यवस्था फक्त आठवड्यातून ३ दिवस चालू राहते ते पण फक्त ओपीडी करिता…*
*कोविड वार्ड मध्ये ३ वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना परिस्थिती बघता त्यांच्या सेवा कार्याआधीच निस्काशीत करण्यात आले.(देवानंद बांगर, राहुल पवार, नलूबाई हिवराळे, रवींद्र अवसमल, शारदा देशमुख) प्रस्तुती कक्ष आहे परंतु त्यांची सुद्धा मोठी गैरसोय होते. शिशु साठी वेगळी व्यवस्था येथे नाही. येथे तर दुसऱ्या प्रस्तुती रुग्णांची सोनोग्राफी ग्राह्य धरत प्रस्तुती केली जाते व स्त्री रोग तज्ञ नसल्याचे जेव्हा लक्षात आले तेव्हा आमच्या प्रतिनिधींच्या भुवया उंचावल्या.*
*ऑपरेशन थिएटर सुद्धा धूर खात पडले आहे. पाण्याच्या व्यवस्थेचं २४ तास सोडा रूग्णांना बाहेरून पाणी घेऊन यावे लागताना तारेवरची कसरतच करावी लागत असल्याने तिथली परिस्थिती काय असेल याची कल्पना करतांना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. सदर इस्पितळात गैर अवस्था तर जश्याच तशी आहेच परंतु आपातकालीन व्यवस्थेसाठी नेमलेल्या रुग्णवाहिका सुद्धा पडीत आहेत. येथे आणीबाणी प्रसंगी सदर ग्रामीण भागातील नागरिक संपर्क साधतात तेव्हा त्यांचा संपर्कच होऊ शकतं नाही किंवा संपर्क झालाही तरीही रुग्णवाहिका रुग्णाला घेउन जाण्यासाठी टाळाटाळ करतात. व सदर रुग्णवाहिका धूळ खात बसल्या आहेत.*
येथिल रिक्त पदे…
*वैद्यकीय अधिकारी – १ पद रिक्त*
*स्टाफ नर्स – २ पदे रिक्त*
*मेडिकल सुप्रिडेंटेड – १ पद रिक्त*
*फार्मसी ऑफिसर – १ पद रिक्त*
*एक्स – रे सायंटिफिक ऑफिसर – १ पद रिक्त*
*सफाईगार (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी पदे मंजूर नसल्यामुळे सामान्य रुग्णालय अमरावती येथील ५ सफाई कर्मचाऱ्यांची गरज असताना २ कर्मचारी तात्पुरते प्रतीनियुक्तीवर घेतलें आहे.*
*महत्त्वाच्या कार्यालयातील कनिष्ठ लिपिक व सहाय्य अधीक्षक ही पदे सूद्धा रिकामी आहे. येथिल कंत्राट ५ कंत्राटदारांना देण्या ऐवजी ४ कंत्राटदारांना काम देण्यात आली आहे.*
*सदर इस्पितळात फक्त ३ दिवस ओपीडी सुरु असते.*
*या सर्व घटनाक्रमाचा पाठपुरावा नितीन कदम यांनी सर्व पुराव्यासह केला असून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य व्यवस्था व लोकप्रतिनिधी यांचा नाकार्तेपणा यांच्या विरोधात शेवटपर्यंत लढा उभारण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
नितीन कदम :- बडनेरा विधानसभा मतदार संघातील भातकुली ग्रामीण रुग्णालयातील या भोंगळ कारभारामुळे येथिल शासकीय प्रशासकीय व्यवस्था जवाबदार आहे. येथिल लोकप्रतिनिधी व आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनाशी खेळत आहे. या हलगर्जीपणाचा आरोग्य विभाग व संबधीत अधिकारी यांच्याविरोधात आंदोलन उभारून लवकरच कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी योग्य पाऊले आम्ही उचलू.