सामाजिक

अस्वस्थ वाटू लागल्याने तो मैदानाबाहेर आला आणि जमीनीवर कोसळला 

Spread the love
भोपाळ  /  विशेष प्रतिनिधी
                अलीकडे तरुणात हृदय विकाराच्या झटक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या मागे व्यस्त दिनचर्या,  कामाचा ताण तसेच फास्ट आणि जंक फुडचे जास्त प्रमाणात सेवन असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण काही वेळा जिम मारताना किंवा खेळतांना देखील जीव गेल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे तारुण्यात अश्या घटना का घडत आहेत ? यावर मतमतांतरे असली तरी तारुण्यात जगाचा निरोप घेणे ही चिंताजनक बाब आहे. खेळतांना जीव गेल्याची घटना नुकतीच घडली आहे.
 मध्य प्रदेशातील खरगोनमधील काटकूट गावात ही धक्कादायक घटना घडलीय. तरुणाच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं आणि एक वर्षांची त्याची मुलगी पोरकी झाली.
काटकूट गावचा इंदल सिंह जाधव क्रिकेट खेळत होता. अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो बेशुद्ध पडला. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. तिथून त्याला मोठ्या खासगी रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी तरुणाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. गावात क्रिकेट स्पर्धा सुरू होती आणि सामन्यावेळी ही घटना घडली. सामन्यात इंदलने फलंदाजी आणि गोलंदाजीही केली होती.
इंदलने सामन्यात ५ षटके गोलंदाजी केली. त्यात पाचवं षटक टाकत असताना त्याची प्रकृती बिघडली आणि तो मैदानातून बाहेर आला. त्यावेळी अस्वस्थ वाटत असलेल्या इंदलला घाम आला. यामुळे तो झाडाखाली काही वेळ बसला. मैदानातून इंदल बाहेर आल्यानं त्याचं षटक दुसऱ्या खेळाडूने पूर्ण केलं. मैदानात खेळाडू विजयाचा जल्लोष करत होते. त्याचवेळी इंदलची प्रकृती बिघडली आणि तो बेशुद्ध पडला. अचानक असा प्रकार घडल्याने आनंदाचं वातावरण भितीत बदललं. तातडीने इंदलला रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. इंदलच्या मृत्यूचं कारण हृदयविकार असावं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close