विदेश

लोकं 150 मीटर उंचीवर उलटे लटकले ; रोलर कोस्टर मध्ये बिघाड आल्याने घडली घटना

Spread the love

जपान / नवप्रहार वृत्तसेवा

                     युनिव्हर्सल स्टुडिओ मधील रोलर कोस्टर राईड मध्ये बिघाड आल्याने तिला मध्येच थांबवावे लागले.त्यामुळे यात बसलेल्या लोकांना उलटे लटकून राहावे लागले. या घटनेमुळे काही काळासाठी धावपळ माजली होती.

ओसाका थीम पार्कमध्ये फ्लाइंग डायनासोर राइड दरम्यान सुमारे 150 फूट उंचीवर अनेक रायडर्स उलटे अडकले होते. राइड सुरु झाल्यानंतर सकाळी 10.55 वाजता (स्थानिक वेळेनुसार) आपत्कालीन थांबा दिला. राइड 150 फूट उंचीवर पोहोचली असताना ही घटना घडली. त्यानंतर सर्व लोक उलटे लटकले. या घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की, राइड मधेच बंद पडली असून, त्यातील स्वार उलटे लटकले आहेत. सुमारे एक तास रोलर कोस्टरवर 32 लोक हवेत अडकले होते. मात्र यामध्ये कोणतीही दुखापत किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही. युनिव्हर्सल स्टुडिओने सांगितले की, त्यांनी सर्व लोकांची सुटका करून शिडीवरून खाली आणले. (हेही वाचा:

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close