क्राइम

त्या प्रकरणात तब्बल साडेतीन वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल 

Spread the love

पुणे  / नवप्रहार मीडिया 

पार्वती टेकडीवर अर्धवय बांधलेल्या पाण्याच्या टाकीजवळ अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळलेल्या मृतदेह प्रकरणात पोलीसांनी न्यायवैद्यक अहवाल आल्या नाबतर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तिच्या डोक्यावर वजनी वस्तूने प्रहार करून तिचा खून करण्यात आला होता. महिलेची ओळख पटली नसली तरी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

न्यायवैद्यक अहवालात  महिलेच्या डोक्यात कठीण वस्तूने मारुन तिचा खून  केल्याचे समोर आले आहे. सव्वातीन वर्षानंतर महिलेचा खून केल्या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात  अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती टेकडी परिसरात अर्धवट बांधकाम करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीजवळ
17 ऑगस्ट 2020 रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेच्या शरीरावर जखमा नव्हत्या.त्यामुळे याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. तसेच व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता.

पर्वती पोलिसांना न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून  नुकताच अहवाल प्राप्त झाला आहे.
या अहवालानुसार महिलेच्या डोक्यावर, तसेच छातीवर कठीण वस्तूने प्रहार केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे अहवालातनमूद केले आहेत. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे , पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे  यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तपास करत असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close