स्वर्गीय ऍड अभिजीत दादा देवके यांना वाहिली कळमगव्हाण वासियांनी श्रद्धांजली.
दर्यापूर( तालुका प्रतिनिधी)
सूरज देशमुख
दर्यापूर तालुका खरेदी विक्री संघाचे विद्यमान अध्यक्ष व तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले एडवोकेट अभिजीत दादा देवके यांचे दुःखद निधनाने संपूर्ण जिल्हा हळहळ व्यक्त करत असताना तालुक्यातील त्यांचे मुळगाव असलेले कळमगव्हाण येथे ग्रामपंचायत तर्फे त्याचबरोबर इतर कर्मचारी वर्गांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सर्वप्रथम स्वर्गीय देवके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्वांनी पुष्पांजली वाहली व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली त्याप्रसंगी सरपंच बेबीबाई राजीव वानखेडे,उपसरपंच पुंडलिकराव बायसकार, ग्रामपंचायत सदस्य कपिल पाटील देवके श्रीमती मंगलाताई निशांतराव, योजना ताई योगेश बोंडे, मंदाताई गोपाळराव गादे ,मुख्याध्यापक मॅडम ,चव्हाण मॅडम, ग्रामपंचायत कर्मचारी खंडारे ताई संगणक परिचारक आकाश राठोड अंगणवाडी कर्मचारी व इतर ग्रामस्थांसह कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन तथा आभार प्रदर्शन ग्रामसेवक संजय चव्हाण यांनी मानले