राज्यात प्रथमच हेल्थ ए. टी. एम तपासणी सुविधा अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध …
आ. बच्चुभाऊ कडू यांनी दिली मोठी भेट ..
रुग्णांची वेगवेगळ्या ८० तपासणी होणार एकाच ठिकाणी …*
अचलपूर (प्रतिनिधी ) किशोर बद्रटिये – अचलपूर तालुका स्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालय निर्मिती असो स्त्री रुग्णालय असो भव्य – दिव्य नेत्र रुग्णालय तसेच आता राज्यातील पहिली हेल्थ ए. टी. एम ची सुविधा अचलपूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाली असून आरोग्य क्षेत्रात राज्यामध्ये अचलपूर तालुका झपाट्याने मजबूत होत असल्याचे प्रतिपादन आज अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात हेल्थ ए. टी. एम चा लोकार्पण प्रसंगी अचलपूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बच्चुभाऊ कडू यांनी केले . यावेळी प्रहार पक्षाचे माजी नगरसेवक संजय तट्टे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेंद्र ढोले , पंजाब बेदरकर, आबिद हुसैन तसेच अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर – कर्मचारी वर्ग उपस्थीतीत होते .
आरोग्य सेवेचे वसा घेऊन रुग्णसेवक म्हणून संपूर्ण राज्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चुभाऊ कडू परिचित आहे .आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या अथक प्रयत्नांनी जिल्हा वार्षिक निधी अंतर्गत आरोग्य वर्धनाकरिता अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात राज्यातून पहिल्यादांच हेल्थ ए. टी. एम ची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामध्ये रुग्णांना विविध तपासणी साठी अनेक ठिकाणी न फिरता जवळपास ८० वेगवेगळ्या तपासणी ची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाला आहे. यामध्ये विशेष तः इसिजी, ब्लड प्रेशर,शुगर ,सर्व मुख्य रक्त तपासणी,वजन , कान, डोळे तपासणी, बॉडी मास ,तापीचे आजार , लिपिड प्रोफाइल आदी ८० वेगवेगळ्या तपासणी रुग्णाची आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या प्रयत्नामुळे उपलब्ध झाली आहे . यावेळी लोकार्पण प्रसंगी आ. बच्चुभाऊ कडू यांनी गेल्या ५० वर्षात मतदार संघात सरकारी बेडची उपलब्ध असणारी संख्य आणि गेल्या १५ वर्षात झपाट्याने मतदार संघातील शहरी व ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात असलेली संख्या बाबत माहिती दिले . यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात तालुका स्तरवर २०० बेड ची सुविधा उपलब्ध होणार असून त्याच सोबत आसेगाव, चांदूर बाजार येथे प्रत्येकी ३०-३० बेड आणि ३ प्राथमिक आरोग्य केंद्राचा निर्मितीमुळे नागरिकांना मोठा लाभ होणार आहे .अचलपूर मतदार संघातील नागरिकाच्या आरोग्याचा दृष्टीने आ. बच्चुभाऊ कडू यांनी विविध आरोग्य शिबिर तसेच नवनवीन सुविधा उपलब्ध केल्याने रुग्णांना याचा मोठा लाभ मिळत आहे .यामुळे आ. बच्चुभाऊ कडू यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .यावेळी आ. बच्चुभाऊ कडू यांनी रुग्णांशी सवांद ही साधला .अचलपूर मतदार संघ आरोग्य क्षेत्रात आ.बच्चुभाऊ कडू यांच्या प्रयत्नामुळे भराटी घेत असल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंडातून मुक्त करण्याचा आ.कडू यांचा निर्धार रुग्णासाठी नवसंजीवनी ठरत आहे हे विशेष .