सायफळ येथे बतकम्मा सण मोठ्या उत्साहात साजरा

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी तालुक्यातील सिमावर्ती भागातील सायफळ येथे बतकम्मा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बतकम्मा हा सण नवरात्र उत्सवा पासून सुरू होतो तर कोजागिरी पौर्णिमे नंतर येणाऱ्या सोमवार गुरूवार च्या दिवशी बतकम्मा देवीचे नदीपात्रात विसर्जन केल्या जाते. बतकम्मा हा सण तेलगू समाजातील अविवाहीत मुलींचा महत्वाचा सण मानले जाते बतकम्मा सण सुरू झाल्यापासून दररोज रात्री महीला,मुली बतकम्मा देवीचे गाणे म्हनत रआनझएंडउच्यआ फुलांची व रानात फुलणाऱ्या विविध रंगीबेरंगी फुलांची एका पात्रात सजावट करतात. फुलांची बतकम्मा देवी बनवून सार्वजनी ठिकाणी एकत्र जमा होऊन त्या सजावट भावती फेऱ्या घेत संसार व जीवनावर आधारीत गाण्यातून जीवनगाथा सांगतात. बदकम्मा विसर्जन डीजेच्या तालावर नाचत लगतच्या नदीपात्रात विसर्जन करून सोबत नेलेला दहीभात प्रसाद एकमेकांना वाटून महीला मुली आनंद व्यक्त करीत असतात. सीमावर्ती भागात अजूनही हा बतकम्मा उत्सव साजरा केला जातो या बतकम्मा उत्सवामुळे गावागावांत भक्तीमय वातावरण झाल्याचे दिसून आले आहे.