जीवनपुरा येथील प्रसिद्ध श्री बालाजी देवस्थान येथे वार्षिक यात्रा महोत्सवनिम्मित ….
आयोजित लोटांगण कार्यक्रमामध्ये ४७ भाविक – भक्तांनी घेतला सहभाग ..
अचलपुर प्रतिनिधी- किशोर बद्रटिये – गेल्या अनेक दशकापासून ऐतिहासिक अचलपुर शहरातील जीवनपुरा येथील अतिप्राचीन बालाजी देवस्थान येथे लोटांगनाची परंपरा आजही कायम .दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आयोजित गेल्या २४ ऑक्टोबरपासून श्री बालाजी देवस्थान येथे वार्षिक महोत्सव निम्मित विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . काल २९ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या लोटांगण मध्ये ४७ भाविक -भक्तांनी सहभाग नोंदविला .बालाजी संस्थान ते बिचछन नदीच्या ताटापर्यंत भक्त हातात नारळ घेऊन सुमारे १ किमीचा प्रवास लोटांगण करून करतात .यावेळी हजारोच्या संख्येने भाविक -भक्त उपस्थित होते .आज ३० ऑक्टोबरला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे . काल २९ ऑक्टोबरला सकाळी बालाजी संस्थान येथे आरती होऊन लोटांगनाला प्रारंभ झाले .यावेळी पूर्ण रस्त्यावर साफसफाई करून रांगोळी मांडण्यात आली होती .भाविक -भक्तासाठी जागो-जागी चहा ,नास्ता वाटप करण्यात आले .
अचलपुर शहरातील प्रसिद्ध बालाजी देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे आयोजित वार्षिक यात्रा महोत्सव निम्मित गेल्या २४ ऑक्टोबर पासून ३० ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रा महोत्सवाचा तीर्थ स्थापना व श्री बालाजीच्या पालखीचे सीमोल्लंघन करण्यात आले .२४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान दरवर्षी प्रमाणे ठरलेल्या परिक्रमा , आरती ,भजन दिंडीच्या गजर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. २८ ऑक्टोबर रोजी आरती ,रामावतार ,ताटीका वध चे आयोजन करण्यात आले . काल २९ ऑक्टोबरला सहाव्या दिवशी सकाळी सुर्योदयापूर्वी ४ ते ६ पर्यँत पंच वाहनावरून श्री बालाजी भजनी दिंडीच्या गजरात राऊळा भोवती पाच परिक्रमा व आरती करण्यात आली .त्यानंतर सकाळी ६ वाजता लोटांगण ला प्रारंभ होऊन ४७ भक्तांनी लोटांगण केले .दुपारी ५ ते रात्री १० पर्यँत श्री बालाजी पालखी ,रथोत्सव यात्रा व गोपाल काला चे आयोजन करण्यात आले आहे .जय बालाजी च्या जय घोषाने परिसर गुंजून उठले .या महोत्सवात अचलपुर -परतवाडा जुळ्या शहरातील भाविक भक्त नव्हे तर राज्यातून विविध ठिकाणांहून भक्तांनी उपस्थिती लावली .यावेळी मोठ्या संख्येने भाविक -भक्त ,प्रतिष्टीत नागरिक ,लहान -मुले ,वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते . अचलपुर माजी न.प उपाध्यक्ष अनिल पिंपळे , अनिल बाहेकर ,अमरावती माजी जिल्हा परिषद सदस्य वासंतीताई मंगरोळे, शानू महाराज दीक्षित, रामभरोसे गौर , उपेन बछले,रवी वानखडे , सामजिक कार्यकर्ते सागर पुरोहित ,नितीन आखूड ,अरुण पांडे ,मंगेश वरहेकर ,अमोल राऊत , गोलू पांडे,वैभव बोबडे ,सोनू ठाकूर ,गजानन वानखडे ,अतुल काळे ,रितेश खोलापूरे ,सुमित याऊल,मंगेश उघडे ,दिलीप जीरासे ,वैभव पांडे आदी मोठ्या संख्येने नागरिक ,भक्त उपस्थित होते .