सामाजिक

गर्भवती महिलेला घेऊन जाणारी कोंढा आरोग्य केंद्राची ॲम्बुलन्स पहेला येथे पंचर-

Spread the love

 

आरोग्य विभागाच सलाईन वर

भंडारा( प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील कोंढा वरून ९ वाजेच्या सुमारास एका डिलिव्हरी बाईला घेऊन कोंढा आरोग्य केंद्राची अंबुलन्स घेऊन ड्रायव्हर होमेश्वर वरघडे भंडारा च्या दिशेने निघाला आणि बघता बघता काय ती ॲम्बुलन्स गाडी पहेला या ठिकाणी 9.30 वाजेच्या दरम्यान पंचर झाली .परंतु त्या गाडीमध्ये ना स्टेपनी होती ना जाक होता फक्त त्या गाडीवर स्टेरिंग धरणारा कोंढा पी एस .सी .चा ड्रायव्हर होता. शेवटी पहेला येथील आरोग्य वर्धिनी केंद्रातील ड्रायव्हर जितेंद्र डोंगरे यांना काल येताच क्षणाचाही विचार न करता आरोग्यवर्धिनी केंद्रातून गाडी काढले व त्या डिलिव्हरी बाईला बसवून भंडारा येथील सामान्य रुग्णालयात नेण्यात आले . याकरिता पहेला येथे युवकांनी सहकार्य केले. येथील जनप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालून अशा गाड्यांची रिपेरिंग करून पेशंट करिता सुरक्षित गाड्या उपलब्ध करून द्याव्यात अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close