अपघात

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात ; 10 ते 12 लोकांचा मृत्यू 

Spread the love

सैलानी बाबा चे दर्शन घेऊन परतत असताना घडला अपघात

छत्रपती संभाजी नगर / नवप्रहार मीडिया 

                 मृत्यूचा महामार्ग म्हणून नकाव पडलेल्या समृद्धी महार्गावर झालेल्या अपघातात 10 ते 12 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ट्रक ला ट्रॅव्हल्स बस भिडल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची भीषणता पाहून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा अपघात रात्री 1 ते 1.30 च्या सुमारास झाल्याचे समजते. मृतकांमध्ये काही पाहणं मुलांचा देखील समावेश आहे.

समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्याजवळ एका ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात दहा ते बारा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परत जात असतांना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसने ट्रकला मागून जोरात धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. धक्कादायक म्हणजे अपघातात मृत व्यक्तींमध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. हे सर्व भाविक नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.

ट्रॅव्हल्समध्ये एकूण 30 जण करत होते प्रवास

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहे. या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश होता. तर, अपघातात 10 ते 12 जणांचा मुत्यु झाला असून, ज्यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. तसेच काही महिला देखील आहेत.

स्थानिक आले मदतीला धावून…

वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वैजापूरसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात आली. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, घटनास्थळी समृद्धी महामार्गावरील बचाव पथक, वैजापूर पोलीस देखील दाखल झाले असून, मदतकार्य सुरू आहे.

मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश…

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात दहा ते बारा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश असल्याचं समोर आलं आहे. तसेच काही महिला देखील या अपघातात मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. तर सर्व जखमी अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close