क्राइम

मोबाइल हिसकावणारा चोरटा जेरबंद

Spread the love
 गडचिरोली /तिलोत्तमा हाजरा
एकटे मोबाईल हाताळत असल्याची संधी साधून मोबाइल संच हातातून हिसकावून पळ काढणारा चोरटा अखेर अहेरी पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. अहेरी शहरात बुधवार (ता. ११) मोबाईल चोरीच्या दोन घटना घडल्या होत्या. संबंधितांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रात्रीच सीसीटीव्ही कॅमेरे व मोबाइल लोकेशनवरून परप्रांतीय चोरट्याचा शोध घेऊन त्याला पकडले.
अहेरी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या बाजूला व संत मानवदयाल आश्रमशाळा परिसरात बुधवारी रात्री ९:१० ते ९:२५ या वेळेत तब्बल दोन मोबाइल चोरीला गेले. मानवदयाल मंदिरालगतच्या एका घरी चंद्रपूरवरून एक महिला नातेवाईक आली आहे. ६५ वर्षीय ही महिला जेवण करून घरीच बेडवर पडून मोबाइल पाहत होती. तेवढ्यात एक अनोळखी मुलगा घरात शिरला व मोबाइल हिसकावून पळाला. महिलेने आरडाओरड केली, लोकांनी पाठलागही केला; परंतु चोर सापडला नाही. पोलिसांनी गॅस एजन्सीमधील सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले. तेव्हा हा परप्रांतीय चोर दिसून आला. अहेरीचे पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी सायबर सेलला माहिती देऊन चोरी गेलेले मोबाइल ट्रेस करण्यास सांगितले. सायबर सेलने या घटनेतील मोबाइलचे लोकेशन पाठविले.प्राप्त लोकेशनवर पोलिसांनी टॉर्चच्या प्रकाशात शोधमोहीम राबवून चोरट्याला एका खासगी बँकेच्या आवारात पकडले. चोरट्यानेही दोन
महिलांचे मोबाइल चोरल्याची कबुली दिली. त्यामुळे दोन्ही महिलांचे मोबाईल परत करण्यात आले आहेत. चोरीप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे.
——————————‘
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close