मेंदूला प्रशिक्षित करून बुध्दीचा विकास साधावा – प्रा. अविनाश नगराळे
लाखांदूर.. तालुक्यातील मोहरणा येथे बिसन राऊत यांच्या ३७व्या समृती दिनानिमित्या गुणवंत विदर्थ्यांचा सत्कार.
निसर्गतःच मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर या जगावर अधिराज्य गाजवले आहे. सर्व व्यक्ती जन्मजात बुद्धिमान असतात फक्त त्यांना आपल्या बुध्दीचा विकास साधावा लागतो. जगप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन याला सुद्धा लहानपणी निर्बुद्ध म्हणून शाळेत प्रवेश नाकारला होता. परंतु मेंदूचा विकास साधून ते जगप्रसिद्ध वैज्ञानिक झाले. म्हणून मेंदूला प्रशिक्षित करून बुध्दीचा विकास साधता येतो. असे मत प्रा. अविनाश नगराळे यांनी व्यक्त केले. ते बिसन राउत यांच्या ३७ व्या स्मृति दीनानिमित्तने प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमला.अध्यक्ष म्हणून माजी पोलिस पाटिल दादाजी राउत,जिल्हा परिषद सदस्य विशाखा ताई माटे,सरपंच नीलेशजि बोरकर,पोलिस पाटिल सुभाषजी राउत,मुख्यद्यापक लीनाताई दोंनाड़कर मैडम,नरेशजी राउत,चाचेरे सर, नारायण राउत सर,मारबते सर्, संतोष पिलारे,नेहाल ढोरे,महादेवजी शेभरकर,अमरशाह माटे, श्रीधरजी राउत,सदाराम वाघधरे पत्रे मैडम,पराते मैडम, रणधे सर,अर्चना रामटेके,अर्चना राउत,अर्चना मेश्राम, सुरेखा बगमारे,मिलिंद रामटेके,जयश्री वाघधरे,मधुकर भोयर, दादाजी बगमारे, देवादास देसाई,देवराम रामटेके, संकर नागोसे,धनीरामजी राउत,हेमराज् वैरागड़े, होते, या कार्यक्रमचे संचालन पंचायत समिति सदस्य मंगेश राउत, प्रास्तविक भाऊरावजी राउत,आभार प्रशिक ठेंगरी यानी केले.या कार्यक्रमच्या यशस्वीते साठी नीलेश राउत, बबलू राउत,सूरज वरभे,राजूजी नागोसे,वैभव नागोसे, भुराजी देसाई लालाजी बगमारे, अनिल बदन,मुन्नाजी मेंढे,ईस्वर नागोसे,सूरज वरभे,निखील वैरागड़े,शेखर चौधरी,रवी दीघोरे,आदी नी सहकार्य केले.