राजकिय

आर्वी तालुक्यात सात पैकी सात ग्रामपंचायतीत भाजपची आघाडी कायम

Spread the love

 

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : तालुक्यातील सात ग्रामपंचायत करिता सार्वत्रिक निवडणूक पार पडली
७ ग्रामपंचायतमध्ये झालेल्या निवणुकीची आज पंचायत समिती सभागृहात मतमोजणी झाली यात निवडणूकिंमध्ये ७ जागी भारतीय जनता पक्ष समर्थित उमदेवार निवडून आलेले आहे.
मा.आ. श्री.दादारावजी केचे व मा.श्री सुमित दादा वानखेडे यांचे कार्यावर विश्वास ठेऊन ७ ग्रामपंचायत पैकी ७ जागी भारतीय जनता पार्टीचे उमदेवार निवडून देऊन भाजपला कौल दिला आहे
जळगाव येथे सरपंचपदी राजेंद्र पाचोडे निवडून आले असून एकूण सदस्य संख्या ११ पैकी आठ भाजप तर काँग्रेसला ३ जागा मिळाली
कोपरा पुनर्वसन येथे गणेश ठाकरे सरपंच निवडून आले यामध्ये भाजप चार आणि तीन काँग्रेसची प्रतिनिधी निवडून आले आहे
इथलापुर येथे सरपंच पदी राजकन्या निघोट यांची वर्णी लागली यामध्ये भाजपाचे पाच आणि काँग्रेसचे दोन सदस्य निवडून आले आहे
भाडोड येथे कुणाल शिंग् रोड हे सरपंच पदाचे उमेदवार ठरले भाजपा ७ आणि ०० काँग्रेस अशी निवडून आलेली सदस्य संख्या आले आहे
तर नांदोरा काळे येथे नितीन दिघडे हे सरपंच पदी निवडून आले असून भाजपा सहा आणि काँग्रेसच एक अशी सदस्य संख्या आहे
तर बोथली नटाला येथे हरीश ढाकुळलकर हे निवडून आले असून भाजपा सहा सदस्य आणि काँग्रेसचे एक सदस्य निवडून आले आहे
माळेगाव ठेका येथे संगीता निकोडे या सरपंच पदी निवडून आल्या असून सदस्य म्हणून भाजपचे सात उमेदवार विजयी झाले आहे तर काँग्रेसचे उमेदवार शून्य आहे
या सर्व विजयी उमेदवार आणि सदस्याचे आमदार दादाराव केचे यांनी अभिनंदन केले आहे
येथील आशीर्वाद कॉम्प्लेक्स समोर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी तसेच नवनिर्वाचित सदस्य आणि सरपंचानी आमदार दादा राव केचे यांच्या नेतृत्वात गुलाल उधळून जल्लोष व्यक्त केला

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close