तुळशीरामजी राजारामजी भोंडे यांना समाज भूषण पुरस्कार

अंजनगाव सुर्जी (मनोहर मुरकुटे)
अखिल भारतीय बारी समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशन लाखो समाज बांधवांचे उपस्थितीत शेगावात रविवारी पार पडले.ह्या महाअधिवेशनाचे निमित्ताने अखिल भारतीय बारी समाजाच्या एकजूटीच दर्शन संतनगरी शेगावात घडले.असून सदर चे अधिवेशनाला संपूर्ण भारतातून, प्रत्येक गावातून हजारोच्या संख्येने स्वतःच्या वाहनांनी बारी समाजाचा जनसमुदाय लाखोच्या संख्येने शेगाव नगरीत अवतरला होता हा जनसमुदाय एक प्रकारचा न होतो न भविष्यतो असा ठरला
स्व गजाननदादा पाटील मार्केट मैदानावर झालेल्या अखिल भारतीय बारी समाज महाअधिवेशनाचे अध्यक्षस्थानी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार होते.तर मुख्य अतिथी म्हणून वंचित आघाडीचे अॅड बाळासाहेब आंबेडकर, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,माजीमंत्री रामदास बोडखे,खा प्रतापराव जाधव, माजीमंत्री बच्चू कडू,आ डाॅ संजय कुटे,आ प्रविण दटके,आमदार. प्रकाश भारसाकळे,आ संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले,आ आकाश फुंडकर, माजी आ हर्षवर्धन सपकाळ, गजानन महाराज संस्थानचे ज्ञानेश्वरदादा पाटील,प्रसेनजीत पाटील,जयश्रीताई शेळके,डाॅ स्वातीताई वाकेकर,रामविजय बुरूंगले आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती.या अधिवेशनात तुळशीरामजी राजारामजी भोंडे यांना अखिल भारतीय बारी महासंघा चे अध्यक्ष श्री. रमेशचंद्र घोलप व जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार श्री संजयजी कुटे यांच्या हस्ते “समाज भूषण पुरस्कार” देण्यात आला .