गांधी चौक येथे शहीद जवानांना वाहली पुष्पचक्र श्रद्धांजली
आर्वी, प्रतिनिधी पंकज गोडबोले
आर्वी : शहरातील गांधी चौकात असलेल्या जयस्तंभाजवळ शहरातील विविध सामाजिक संघटनेचे माध्यामातून कारगिल विजय दिवसाच्या निमित्त विजय दिवशी शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. आर्वी शहरातील विविध सामाजिक संघटने कडून कारगिल विजय दिवशी भारतीय सैनिकांच्या सौर्य आणि बलिदान दिवशी गांधी चौकात असलेल्या जयस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली श्रध्दांजली वाहताना भारत माता की जय ,वंदे मातरम, वीर जवान अमर रहे ,असे घोषणा देत परिसर हादरून टाकले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्री लखन भाऊ अग्रवाल उपस्थित होते .संचालन वृषभ निस्ताने यांनी केले आभार शैलेश तलवारे यांनी मानले कार्यक्रमाला राजेश शिरगरे ,गुड्डू पठाण ,शेख मोहसीन, संदेश ठाकरे, नितीन आष्टीकर, शिरीष कळे,प्रभाकर निंबाळकर ,रवी खंडारे ,पिंटू छंगानी, सुहास ठाकरे, सतीश माहूरकर ,रवींद्र निंबाळकर प्रदीप रुईकर मंगेश तांबेकर पांडुरंग मलिये प्रशांत हेरोडे किशोर काळपांडे राहुल काळे व परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.