शासनाला इशारा देण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी धडकल्या जिल्हाधिकार्यालयावर

यवतमाळ( वार्ता )
आझाद मैदान यवतमाळ येथे गेल्या 14 दिवसापासून उपोषण सुरू आहे अद्याप पर्यंत शासनाचा कुठलाही प्रतिनिधी न आल्याने, राजकीय पुढारी यांनी सुद्धा उपोषण मंडपाला भेट न दिल्याने त्यावर यवतमाळ शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये रोष व्यक्त होत असून,दिनांक 5 ऑक्टोंबर ला विद्यार्थ्यांचा हजारोच्या संख्येने आझाद मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालया वर काढण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने खाजगी कंपन्यांना दिलेला पद भरतीचा आदेश त्वरित रद्द करावा, शासकीय यंत्रणेमध्ये असलेले कंत्राटी कर्मचाऱ्यांना विनाअठ शासन सेवेत कायम करण्यात यावे. महाराष्ट्रातील 62 हजार शाळांचे खाजगीकरण त्वरित थांबवण्यात यावे. मोर्चामध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुरज खोब्रागडे यांनी बेडी आंदोलन केले.
शासनाबाबत अनेक विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगारांनी, कडव्या शब्दात रोष व्यक्त केला. प्राध्यापक श्रीकांत आडे यांनी आपल्या भाषणातून शासकीय धोरणावर टीका केल्या शासनाने जनसामान्यांचा विचार करून, गोरगरीब विद्यार्थ्यांचे शिक्षणाबाबत विचार करावा.
एल्गार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मुनेश्वर त्यांनी आपल्या भाषणातून रोष व्यक्त करताना कंत्राटी कर्मचारी भरती, राज्यातील शाळांचे खाजगीकरण आदेश त्वरित रद्द करावे तर शासनाने या विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन चढण्याचा इशारा युवा एल्गार संघटनेच्या वतीने प्रशांत मुनेश्वर यांनी दिला. जिल्हाधिकारी मार्फत शासनाला निवेदन देतेवेळी, नानाभाऊ गाड बैले, प्रशांत मुनेश्वर, सुरज खोब्रागडे,ज्ञानेश्वर गायकवाड, सुरज इंगोले,मोरेश्वर बिपिन चौधरी, नितेश मेश्राम यांनी निवेदन दिले.