डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या मुलीच्या अंत्यविधी पूर्वी घडलेल्या घटनेने सर्व अचंभीत

मेक्सिको सिटी, / नवप्रहार मीडिया
मुलांना काही त्रास झाला कीं पालक लगेच त्यांना डॉक्टर कडे घेऊन जातात. डॉक्टर शक्यतो त्यांना बरे करण्याचा प्रयत्न करतो. पण कधी कधी डॉक्टर ला देखील मुलांना वाचविण्यात यश येत नाही. अश्या वेळी पालकांची मनस्थिती काय होते हे त्यांचे त्यांनाच माहीत. डॉक्टरांनी मेउत घोषित केलेल्या चिमुकलीच्या शरीरात जर काही हालचाल झाली तर तिच्या आईवडीलांना आपलं मुलं जिवंत आहे या गोष्टीचा जो आनंद मिळतो तो जगातील कुठल्याच गोष्टीत नाही. असाच काहीसा प्रकार मेक्सिको सिटीत घडला आहे.
एक 3 वर्षांची चिमुकली. जिच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या, उलट्याही होऊ लागल्या, तिला ताप भरला. तिच्यावर बरेच उपचार झाले. पण डॉक्टर तिला वाचवू शकले नाही. तिचा मृत्यू झाला. तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात होतो. तोच तिचा मृतदेह ठेवलेल्या शवपेटीतून अचानक धुरासारखं काहीतरी दिसलं. म्हणून शवपेटी उघडून पाहिलं.
त्यानंतर पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे.मेक्सिकोत घडलेली 17 ऑगस्टची ही शॉकिंग घटना. मुलीची तब्येत बिघडल्यावर पालकांनी तिला व्हिला डी रामोस इथल्या बालरोग तज्ज्ञाकडे नेलं. तिची अवस्था पाहून डॉक्टरांनी तिला मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगितलं. मुलीला डिहायड्रेशन आणि ताप असल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
नंतर तिला घरी नेण्यास सांगितलं.CRPF जवानाच्या घरी जन्माला आलं असं कन्यारत्न की डॉक्टर शॉक; पण लोक म्हणतायेत, ‘देवीचा अवतार’पण घरी आणल्यानंतर मुलीची प्रकृती पुन्हा बिघडली. तेव्हा तिला दुसऱ्या डॉक्टरांकडे नेलं. जिथं इतर औषध दिली. मुलीला फळं आणि पाणी देण्याचा सल्ला दिला.
मात्र मुलीच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने कुटुंबीयांनी मुलीला पुन्हा रुग्णालयात नेलं. तिला आयव्ही ड्रिपसाठी आणलं होतं, परंतु ऑक्सिजन मिळण्यास वेळ लागला. काही वेळानं डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. डिहायड्रेशनमुळे तिचा मृत्यू झाल्याचं कारण दिलं.मुलीचा मृतदेह दुसऱ्यादिवशी अंत्यसंस्काराला नेण्यात आला.
वरून काच असलेल्या या शवपेटीत आता अचानक धूर दिसू लागला. मुलीच्या आईने ते पाहिलं. तिनं सर्वांना याबाबत सांगितलं. पण कुणाचा तिच्यावर विश्वास बसला नाही.
मुलगी गमावल्याच्या दुःखाने तिला भास होत असावा असं सर्वांना वाटलं. थोड्या वेळाने मुलीच्या आजीला मृतदेहाचे बंद डोळे हलताना दिसले. तिनेही याबाबत सर्वांना सांगतिलं. मग सर्वांना धक्काच बसला.
शवपेटी उघडण्यात आली आणि पाहतात तर काय मुलगी जिवंत होती.3 वर्ष सोफ्यावर ठेवला आईचा मृतदेह आणि त्यासोबत केला असा प्रकार, ऐकून विश्वास बसणार नाहीतसंच मुलीला उचलून पुन्हा रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी तिची तपासणी केली. पण तोपर्यंत मुलीचा पुन्हा मृत्यू झाला होता. स्थानिक प्रकाशन एल युनिव्हर्सलच्या मते, मुलीच्या आईने स्थानिक रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.