वघारा टाकळी येथील वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा चोवीस तासानतंर सापडला मृतदेह
पारवा पोलीस स्टेशन आकस्मित मृत्यू नोंद थांबता थांबेना
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वघारा टाकळी येथील शेतकरी गजानन भाऊराव गेडाम वय वर्षे अंदाजे ४० हे नेहमी प्रमाणे आपल्या शेताकडे बैलं चारण्यासाठी जात असतांना वघारा टाकळी येथील वाघाडी नदीच्या च्या धबधब्या जवळून नदीच्या पलीकडे बैल घेऊन नदी ओलांडत असतांना अचानक वाघाडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली पाण्याच्या वाढत्या प्रवाहात शेतकऱ्याला तोल सांभाळता आला नसल्याने प्रवाहामूळे शेतकरी धबधब्या जवळ कोसळला धबधब्याच्या प्रवाहाने शेतकरी खोलवर जाऊन बुडाला. या घटनेची माहिती वघारा टाकळी येथील गावक-यांना होताच गावक-यांनी वाघाडी नदीकडील शेतकरी पाडलेल्या स्थळावर धाव घेतली. त्याचवेळी गावातील काही नागरीकांनी या घटनेची माहिती पारवा पोलीस व महसूल विभागाला दिली.पारवा पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळ तत्परतेनी गाढून काही भोई समाजाच्या तरबेज पोहणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने परिसरात पाण्यात पडलेल्या व्यग्तीचा शोधमोहीम सुरू केली मात्र वाघाडी नदीपात्रात पाणी पातळी मोठ्या प्रमाणात असल्याने दिवसभर बूडआलएल्यआ व्यग्तिचा थांगपत्ता लागला नाही.त्यामुळे दुस-या दिवशी सकाळी एन डी आर एफ च्या पथकाला पाचारण करण्यात आले. एन डी आर एफ च्या पथकाने शोध मोहीम हाती घेत शोधकार्य सुरू करताच काही तासात पाण्यात पडलेल्या व्यग्तीचा मृतदेह हाती लागला. पाण्याच्या बाहेर मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी घाटंजी येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला असून पारवा पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित मृत्यू नोंद करण्यात आली आहे.सदर कार्यवाही पारवा ठाणेदार लिंगाडे साहेब व त्यांचे पारवा पोलीस स्टेशन सहकारी यांचे निदर्शनात पार पडली.